नागपूर: जिओ ब्रँडच्या अंतर्गत येणारे जिओ प्लॅटफॉर्म (Jio Platforms) -डिजिटल सर्व्हिस यांनी $ 15 दशलक्ष सिलिकॉन व्हॅली (Silicon Valley-based startup) स्थित टू प्लॅटफॉर्म (Two Platforms ) माजी सॅमसंग तंत्रज्ञान आणि प्रगत संशोधन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रणव मिस्त्री (Pranav Mistry) यांनी स्थापना केलेल्या स्टार्ट – अपमध्ये गुंतवणूक केली आहे. हे स्टार्ट – अप एक आर्टिफिशिअल रिऍलीटी कंपनी (artificial reality company)असून एक वेगळा AI अनुभव देणे प्रदान करते.
ही गुंतवणूक एआर कंपनीतील 25 टक्के भागभांडवलासाठी डायलुटेड बेसिसवर करण्यात आली आहे.
Jio चे संचालक आकाश अंबानी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही Two मधील AI/ML, AR, metaverse आणि Web 3.0 ( AI/ ML, AR, metaverse and Web 3.0)च्या क्षेत्रातील प्रबळ अनुभव आणि क्षमतांनी प्रभावित झालो आहोत. इंटरएक्टिव्ह एआय, इमर्सिव्ह गेमिंग आणि मेटाव्हर्सच्या क्षेत्रात नवीन उत्पादनांचा विकास जलद करण्यात मदत करण्यासाठी आम्ही Two सोबत एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत.”
JIO invests $15M in TWO. 🙂https://t.co/0Dk3FFc18t https://t.co/qFuixIbpNs
— Mistry (@pranavmistry) February 4, 2022
Two प्लॅटफॉर्मचे ((Two Platforms ) मत आहे की पोस्ट टेक्स्ट आणि व्हॉइस , एआय व्हिज्युअल आणि परस्परसंवादी आहे. त्याचे AR प्लॅटफॉर्म इमर्सिव्ह स्पेसमध्ये उपस्थित राहून, मानवाच्या डिजिटल अवतारांशी संवाद साधून रिअल-टाइम AI व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल सक्षम करेल.
ग्राहकांसाठी प्रथम एआय तंत्रज्ञान आणण्याचा त्यांचा मानस आहे, त्यानंतर मनोरंजन, गेमिंग , शिक्षण, निरोगीपणा, सेवा इत्यादी क्षेत्रांमध्ये एंटरप्राइझ सोल्यूशन्स आणण्याचा त्यांचा मानस आहे.
मिस्त्री यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “जिओ भारताच्या डिजिटल परिवर्तनाचा पाया आहे. एआयच्या सीमा पार करण्यासाठी आणि ग्राहकांना आणि व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर कृत्रिम वास्तविकतेचे ऍप्लिकेशन सादर करण्यासाठी Jio सोबत भागीदारी करण्यास आम्ही TWO मध्ये उत्साहित आहोत.”