1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाई

Spread the love

आ.बच्चू कडू यांच्या प्रयत्नांना यश

ज्या पीक विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांना २५ टक्के रक्कम आगाऊ नुकसान भरपाई म्हणून देण्यास अखेर पिक विमा कंपनीने सहमती दिली. या संदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांनी विधिमंडळात तसेच मंत्रिमंडळ बैठकीत प्रथम चर्चा घडवली होती. दिवाळीच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी असे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने अधिसूचना काढून हा प्रस्ताव पाठविला होता. राज्यात अकोला जिल्ह्यात प्रथमच अशाप्रकारे नुकसान भरपाई मिळत असून आता राज्यातील अन्य १९ जिल्ह्यातही हीच प्रक्रिया राबवली जात आहे.

कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत ३३ महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यात प्रामुख्याने सोयाबीन, मूग, उडीद, तूर व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर जिल्ह्यात राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री बच्चू कडू यांनी दौरे करुन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांना मध्य हंगामात आलेल्या प्रतिकुल हवामान परिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत २५ टक्के आगाऊ मोबदला देण्यात यावा, अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली होती.

याबाबत विधी मंडळ तसेच मंत्रिमंडळ पातळीवर पालकमंत्री बच्चू कडू यांनी सर्वप्रथम मुद्दा मांडून चर्चा झाली होती. जिल्हा प्रशासनाने याबाबत ११ ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली होती. मात्र विमा कंपनी त्यास अमान्य करीत होती. वारंवार त्रुट्या दर्शवण्यात येत होत्या. त्याची पूर्तता ही होत होती. अखेर पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिलेल्या निर्देशानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयात विमा कंपनीच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांच्या समवेत बैठक झाली.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अनिल देशमुखांना फरार घोषित करून; त्यांची पूर्ण संपत्...

    September 3rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं काम करत आहेत. साक्षीदार फोडण्याचाही...

    स्कूल चले हम..!! विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह पाहू...

    October 5th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकोविड कालावधीच्या मोठ्या ब्रेकनंतर प्रथमच परळी तालुक्यातील टोकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत उपस्थित झालेल्य...

    वीज कंपन्यांतील नियमित व सहायक कर्मचाऱ्यांना सानुग्र...

    October 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्य सरकारच्या वीज कंपन्यांमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा निर्णय ऊर्जा...