1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पुढील ‘तीन’ महिन्यात 5जी सेवा सुरू होणार?

thumbnail-wordpress-thefreemedia
Spread the love

लिलावाच्या माध्यमातून देशाच्या महसूल खात्यात दीड कोटी रक्कम जमा

नवी दिल्ली: भारतीय नागरिकांना पुढील ३ महिन्यात 5G सेवांचा लाभ भेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक महिन्यांपासून लोक 5G सेवेची वाट पाहत आहे. पहिल्या टप्प्यात देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली जाऊ शकते. यामध्ये मुंबई, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ यांचा समावेश आहे. दुसरीकडे, बोली लावण्यात आघाडीवर असलेल्या रिलायन्स जिओने सांगितले की, ते कमीत कमी वेळेत सेवा सुरू करण्यास तयार आहे.

स्पेक्ट्रम लिलाव सोमवारी संपल्यानंतर सरकारला आशा आहे की पुढील प्रक्रिया वेगाने झाल्यास 5G सेवा यावर्षी ऑक्टोबरपर्यंत नागरिकांसाठी सुरु होईल. 1 ऑगस्ट रोजी संपलेल्या टेलिकॉम स्पेक्ट्रमच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लिलावात 1.5 लाख कोटी रुपयांच्या बोली आल्या आहेत. यामध्ये रिलायन्स जिओने सर्वाधिक बोली लावली आहे. जिओने स्पष्टपणे सांगितले की ते शक्य तितक्या लवकर 5G सेवा सुरू करण्यास तयार आहे.

5G सेवा कधी सुरू होईल माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, येत्या काही दिवसांत लिलाव प्रक्रिया पूर्ण होईल. 10 ऑगस्टपर्यंत स्पेक्ट्रमची मान्यता आणि वाटप संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण केल्या जातील. अशा परिस्थितीत ऑक्टोबरपर्यंत देशात 5G सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. यासोबतच भारतातील स्वस्त सेवेचा ट्रेंड यापुढेही कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री असेही म्हणाले की भारताच्या दूरसंचार उद्योगात पुढील दोन वर्षांत दोन-तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे आणि सरकारने उचललेल्या पावलांमुळे या क्षेत्रातील अनिश्चितता आणि जोखीम दूर झाली आहे. संभाव्य गुंतवणूक 4G आणि 5G पिढीतील टेलिकॉम सेवांमध्ये असेल. यामुळे वॉईस क्वॉलिटी चांगली होईल आणि हायस्पीड इंटरनेट डेटाही दिला जाईल.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    चीनच्या दिग्गज कंपनी Tencent, Alibaba हजारो लोकांना ...

    March 26th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: गेल्या आठवड्यात रॉयटर्सच्या एका अहवालानुसार, दोन दिग्गज चीनी कंपन्या, अलीबाबा(Alibaba Group) ग्रुप ...

    Reliance Jio चा पहिला लॅपटॉप लवकरच बाजारात

    February 7th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveग्राहकांसाठी स्वस्तात मस्त सेवा देणाऱ्या रिलायन्स जिओने आता लॅपटॉप तयार करण्याचं ठरवलं आहे. रिलायन्स जिओचा ...

    हवेत उडणारी बस नागपुरात चालविण्याचं स्वप्न; गडकरी

    March 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: हवेत उडणारी बस नागपुरात चालविण्याचं माझं स्वप्न आहे. त्याची तयारी सुरू करा मी त्यासाठी पैसे आणतो. त...