1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील 99 कोटी रक्कम अद्यापही शिल्लक

Spread the love

आजपावेतो राज्यसरकारने केला 31 कोटीचा खर्च

मुख्यमंत्री सहाय्यता मुख्य निधी ही प्रामुख्याने वैद्यकीय आणि नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान जनतेला अर्थसहाय्य करण्यासाठी वापरली जाते पण आजमितीस एकूण जमा 130 कोटी पैकी आजपावेतो फक्त 31 कोटी खर्च करण्यात आली असून 99 कोटी रक्कम शिल्लक असल्याची आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुख्य निधीत जमा रक्कम, खर्च करण्यात आलेली रक्कम आणि शिल्लक रक्कमेची माहिती विचारली होती. मुख्यमंत्री सचिवालयाच्या सहाय्यता निधी कक्षाने अनिल गलगली यांस कळविले की मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मुख्य निधीत दिनांक 28 नोव्हेंबर 2019 पासून आजमितीस 130 कोटी रुपये रक्कम जमा झालेली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ( मुख्य निधी) नैसर्गिक आपत्ती आणि दुर्घटनांमधील मृतांच्या वारसांना 9 कोटींचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. वैद्यकीय कारणांसाठी 4932 नागरिकांना 22 कोटींचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ( मुख्य निधी) दिनांक 30 सप्टेंबर 2021 रोजी वैद्यकीय आणि नैसर्गिक आपत्तीसाठी मिळून 99 कोटी रुपये शिल्लक आहे. दिनांक 28 नोव्हेंबर 2019 पासून 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 33 प्रकरणात अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे.

अनिल गलगली यांच्या मते मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय अर्थसहाय्य जास्तीत जास्त करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत प्रत्येक दिवशी सरासरी 8 नागरिकांना अर्थसहाय्य करण्यात येत आहे.

🔹प्रत्येक दिवशी सरासरी 8 नागरिकांना अर्थसहाय्य

Claim Free Bets

🔹वैद्यकीय कारणांसाठी 22 महिन्यात 4932 नागरिकांना 22 कोटींचे अर्थसहाय्य वितरित

🔹नैसर्गिक आपत्ती आणि दुर्घटनांमधील मृतांच्या वारसांना 9 कोटींचे अर्थसहाय्य

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    माझा स्टॅन स्वामी होऊ नये, सचिन वाझेचं कोर्टात वक्तव्य

    August 31st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया टॉवरजवळ कारमध्ये ठेवण्यात आलेली स्फोटकं आणि याच कारचा मालक मनसुख हि...

    रामदास कदम यांना विधानभवनाच्या गेटवर अडवलं

    December 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या...

    अनिल परब- 28 युनियन आहेत, कुणाशी चर्चा करायची हे काम...

    November 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveएसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर...