The Free Media

pharmaceutical companies (1)

औषधांविषयीच्या जाहिरातींचे नियमन, औषधे आणि जादुई प्रभाव असणारे उपचार (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, 1954 अंतर्गत केले जात असून राज्य सरकारे या कायद्याची अंमलबजावणी करतात. औषधे आणि सौंदर्यप्रसाधने नियमन,1945 मध्ये 2015 साली दुरुस्ती करण्यात आली असून, त्यानुसार, एच, एच-1 आणि एक्स या सूचीत समाविष्ट औषधे (म्हणजेच केवळ डॉक्टरांच्या चिठ्ठीवर मिळणारी औषधे) यांची जाहिरात करता येत नाही. असे करायचे असल्यास, केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता असते. जर या अटीचे पालन केले नाही, तर अशा उत्पादकांवर कारवाई करण्याचे अधिकार, राज्यातील परवाना देणाऱ्या प्राधिकरणाला आहेत.

दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिराती आणि त्यामुळे जनतेच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन, आयुष मंत्रालयाने दिलेल्या माहितीच्या आधारावर,माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 12 जून 2017 रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांना, ज्या औषधी उत्पादनांसाठी आयुष अथवा राज्यातील औषध परवाना प्राधिकरणाकडून मिळालेला वैध परवाना मिळाला आहे, केवळ अशाच उत्पादनांची जाहिरात करायला परवानगी देण्यात आली आहे.

देशातील औषधांची विक्री आणि वितरण यांचे नियमन करण्याचे अधिकार, राज्य परवाना प्राधिकरणाला असतात, त्यासाठी औषधांची तपासणी करुन, त्यानंतर औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 तसेच औषधे आणि सौंदर्य प्रसाधने नियमन 1945 अंतर्गत त्यांना परवाना दिला जातो. या नियमांनुसार, विक्रीचा परवाना देण्याआधी त्याच्या सर्व अटींबाबतची समाधानकारक पूर्तता व्हायला हवी असते. यात औषधनिर्मितीसाठी पुरेसा परिसर, योग्य त्या साठवणूक व्यवस्था, औषध विक्रीवर देखरेख तसेच नियंत्रण ठेवण्यासाठी पात्र आणि सक्षम व्यक्तींची गरज अशा अटींचा समावेश आहे.

Share on Social media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
Share on email
Email

Related Post

uddhavthackery-cm-thefreemedia

विधानसभेत बहुमत सिद्ध करा; राज्यपालांचा आदेश

नागपूर: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक मोठी बातमी आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकारनं बहुमत गमावलं

Read More »
chip technology-thefreemedia

आर्मने (Arm )स्मार्टफोन गेम्ससाठी नवीन चिप तंत्रज्ञान लाँच केले

नागपूर: सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पच्या मालकीची ब्रिटीश चिप टेक्नॉलॉजी फर्म आर्म लिमिटेडने (Arm Ltd) मंगळवारी नवीन चिप तंत्रज्ञानाच्या संचाचे अनावरण केले ज्याचा उद्देश असे आहे की,

Read More »
thumbnail-thefreemedia

‘आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाहीत’; गुलाबराव पाटील

खासदार संजय राऊतांना गुलाबरावांचे प्रत्युत्तर गुवाहाटी: शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. गुलाबराव पाटलांना पुन्हा टपरीवर नाही

Read More »

Latest News