नागपूर: तीव्र भूकंपाच्या धक्क्याने आज सकाळी अफगाणिस्तान हादरले. रिश्टर स्केलवर याची नोंद ६.१ इतकी झाली हाेती या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ९२० नागरिक ठार झाल्याचे वृत्त ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेने दिली आहे.
#WATCH | 950 people died and over 600 were injured in an earthquake of magnitude 6.1 in Afghanistan.
— ANI (@ANI) June 22, 2022
(Source: Reuters) pic.twitter.com/xz5Mz82rm5
६२० जण जखमी आहेत. ढिगाऱ्याखाली शेकडो जण अडकले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती स्थानिक प्रशासनाने व्यक्त केली आहे.
आज पहाटे २ वाजून २४ मिनिटांनी अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा तीव्र धक्का बसला. याचा केंद्र बिंदू अफगाणिस्तानच्या खोस्त शहरापासून ४४ किलोमीटर लांब होता.
भूकंपाचा धक्का अफगाणिस्तानमध्ये सुमारे ५०० किलोमीटर जाणवले. चार जिल्ह्यांमधील सर्वाधिक हानी झाली आहे.
या भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी नोंदली असल्याचे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने म्हटलं आहे. आतपर्यंत भूकंपात ९२० नागरिक ठार झाले आहेत. ६१० जण गंभीर जखमी झाल्याचे अफगाणिस्तानच्या आपत्ती निवारण विभागाने म्हटले आहे.