अवकाश संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना मोठं यश आलं असून चंद्रावरून आणलेल्या मातीत बाग फुलवण्यात यश आलेलं आहे. चंद्रावरून आणलेल्या मातीत रोप उगवल्यामुळे भविष्यात चंद्रावर अन्न आणि ऑक्सिजन तयार करण्याच्या दिशेने मिळालेलं हे एक महत्त्वाचं यश आहे. ‘नासा’च्या ‘आर्टेमिस प्रोग्राम’ अंतर्गत हे संशोधन करण्यात आले आहे.
‘अपोलो’ मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांनी चंद्रावरुन पृथ्वीवर माती आणली होती. या मातीत बाग फुलविण्याचा प्रयोग करण्यात आला होता. या प्रयोगात शास्रज्ञांना यश आले आहे. चंद्रावरील मातीत शास्त्रज्ञांनी प्रथमच रोपे उगवली आहेत. मोठे पाऊल मानले जात आहे. आता मानवाला चंद्रावर पुन्हा पाठवण्याच्या ‘नासा’च्या ‘आर्टेमिस प्रोग्राम’अंतर्गत हे संशोधन करण्यात आले आहे.
…आणि चंद्राच्या मातीत फुलली बागhttps://t.co/9sRmf3Xu31#Moon #lifeonmoon #SpaceX #ISRO #NASA #spacelife #plantmom #Flowers #digitalmedia #mediahub #mediainflucer #news #media #newsmedia #thefreemedia #TFM pic.twitter.com/eiTwTZ3PoJ
— THE FREE MEDIA (@THEFREEMEDIA2K) May 14, 2022
‘नासा’च्या ‘अपोलो’ ११, १२ आणि १७ व्या मोहिमेदरम्यान चंद्राच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून ही माती पृथ्वीवर आणण्यात आली. त्यानंतर संशोधकांनी या मातीत बिया पेरल्या, त्यांना पाणी, पोषक तत्त्वे आणि प्रकाश दिला. तसेच होणाऱ्या बदलाची नोंद ठेवण्यात आली. अर्बिडोप्सिसच्या (Arabidopsis) बिया पेरण्यात आल्या होत्या. अखेर काही दिवसातच कुंडीत लहान रोपटे उगवले.