1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘शरद पवारांच्या आशीर्वादानेच अनिल देशमुखांनी गडकरी कारखाना बळकावला’

Sharad Pawar NCP
Spread the love

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील साखर कारखान्यांच्या घोटाळा प्रकरणात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. मात्र यावरूनच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाना साधला आहे.

राम गणेश गडकरी साखर कारखाना प्राजक्त तनपुरेंच्या नावाने ट्रान्सफर करण्यात आला. १०० कोटीची संपत्ती १३ कोटीत दिली गेली. तीच संपत्ती तनपुरे यांनी अनिल देशमुख यांना पास ऑन केली. प्राजक्त तनपुरे हे अनिल देशमुखांच्या वाटेवर असून त्यांच्यावरही कारवाई होणार.तसेच शरद पवारांच्या आशीर्वादानं अनिल देशमुख यांनी बेनामी पद्धतीनं प्राजक्त तनपुरे यांच्याद्वारे रामगणेश गडकरी साखर कारखाना काबीज केला. त्याचे पुरावे बाहेर आले आहेत, त्यांच्या अडचणी वाढणार असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

दरम्यान प्राजक्त तनपुरे यांनी मात्र सर्व आक्षेप फेटाळून लावले आहेत. ईडी अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना मी समाधानकारक उत्तरं दिली आहेत. तसंच पुढे त्यांनी बोलावल्यास आपण चौकशीला जाऊ, असंही तनपुरे म्हणाले आहेत. मला आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ईडीने चौकशीला बोलावलेलं होतं. मात्र ईडीचे अधिकारी एका बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे तीन वाजल्यापासून चौकशीला सुरुवात झाली. मी ईडीला सविस्तर उत्तर दिलेली आहेत.

मला जे जे प्रश्न विचारण्यात आले त्यांची मी त्यांना उत्तर दिलेली आहेत. जे आक्षेप नोंदवले जात आहेत त्यात काहीही तथ्य नाही. काही तांत्रिक माहिती जी मी पाठ करु शकत नाही ती मला पुन्हा बोलावल्यास मी ईडीच्या अधिकाऱ्यांना देईन, असं तनपुरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान कर...

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनाशिक जिल्ह्यातून शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी विशेष मोहीम जिल्हा प्रशा...

    Omicron Variant: 295 प्रवासी परदेशातून मुंबईला परतले...

    December 7th, 2021 | THE FREE MEDIA

    Spread the loveओमिक्रोन कोरोनाव्हायरसचा एक नवीन आणि धोकादायक प्रकार, संभाव्यपणे देशाला त्याच्या नियंत्रणाखाली घेत आहे. कोर...

    केंद्राने सिलेंडरचे भाव, लोकांनी कमी स्वयंपाक करावा ...

    October 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात इंधनासोबतच घरगुती गॅस सिलेंडर, डाळी, भाज्यांच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. दरम्यान महिला व बालकल्याण...