1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अनिल देशमुख हाजीर हो..!! 16 नोव्हेंबरला कोर्टात हजर रहाण्यासाठी आदेश

anil deshmukh2
PC: ANI
Spread the love

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भातली नवीन बातमी समोर येत आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात आता महानगर दंडाधिकारी न्यायालयानं समन्स जारी केलेत. अनिल देशमुख यांना 16 नोव्हेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत. मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने बजावलेल्या समन्सकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आलं, असे निरीक्षण अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवलं आहे. त्यानंतर त्यांना समन्स बजावलेत.

मनी लाँड्रिंगप्रकरणी समन्स बजावूनही ईडीच्या चौकशीला हजर न राहिल्याबद्दल ही कारवाई न्यायालयाकडून सुरु करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी देशमुख यांच्याविरोधात शुक्रवारी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे.

भारतीय दंडसंहिता 174 अंतर्गत न्यायालयानं देशमुख यांच्यावर ही कारवाई सुरू केली आहे. ईडीने देशमुख यांच्याविरोधात केलेल्या अर्जावर न्यायदंडाधिकारी आर. एम. नेर्लीकर यांच्यापुढे सुनावणी होती. ईडीने बजावलेले समन्स आरोपी, त्यांची मुलगी किंवा त्यांच्या वतीने वकिलांनी घेतले.

अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आणि खंडणी वसुलीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सीबीआयकडूनही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ईडीनं याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. ईडीनं देशमुख यांना आतापर्यंत पाचवेळा समन्स बजावले आहे. मात्र अनिल देशमुख हे अद्याप एकदाही चौकशीसाठी हजर राहिलेले नाही. हे निदर्शनात आल्यानंतर ईडीनं देशमुख यांच्या विरोधात दंडाधिकारी न्यायालयात दावा दाखल केला आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    वॉर्ड पुनर्रचना करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा र...

    December 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशपातळीवर जातीय जनगणना करण्यास मोदी सरकार चालढकल करीत असल्याने वाद निर्माण झालेला आहे. त्यात कोरोनाच्या प्...

    गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांना परवानगी; राज्य शा...

    September 18th, 2021 | THE FREE MEDIA

    Spread the loveराज्यातील निवडणूक नियमावली आणि कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या २५० व त्यापेक्षा कमी सभासद असलेल...

    रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका : चित्रा वाघ

    October 14th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या आणि अखेर आता राष्ट्रवादी काँ...