The Free Media

Maharashtra-school (1)

नागपूर: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता दिली. लसींच्या दोन मात्रा न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने क्लास उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

कोरोनामुळे मागील दोन वर्ष विद्यापीठ कॅम्पस बंद होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा विद्यापीठे, महाविद्यालये सुरु व्हावीत अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. दरम्यान आज महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासर्व विषयी ट्विट करून माहिती दिली.

पुढे ते म्हणाले विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता दिली. तसेच लसींच्या दोन मात्रा न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने क्लास उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत (RUSA) 37 कोटी 58 लाख 33 हजार इतका निधी राज्य प्रकल्प संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास मान्यता दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Share on Social media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
Share on email
Email

Related Post

Tata Steel-thefreemedia

टाटा स्टील (Tata Steel) 4 वर्षांमध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या विकासावर 1,200 कोटी रुपये खर्च करणार

नागपूर:Tata Steel Ltd ने पुढील तीन ते चार वर्षात नवीन तंत्रज्ञानाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. स्टील च नव्हे तर इतर साहित्यात प्रवेश करण्याच्या प्रयत्नाचा

Read More »
uddhavthackery-cm-thefreemedia

विधानसभेत बहुमत सिद्ध करा; राज्यपालांचा आदेश

नागपूर: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक मोठी बातमी आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकारनं बहुमत गमावलं

Read More »
chip technology-thefreemedia

आर्मने (Arm )स्मार्टफोन गेम्ससाठी नवीन चिप तंत्रज्ञान लाँच केले

नागपूर: सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पच्या मालकीची ब्रिटीश चिप टेक्नॉलॉजी फर्म आर्म लिमिटेडने (Arm Ltd) मंगळवारी नवीन चिप तंत्रज्ञानाच्या संचाचे अनावरण केले ज्याचा उद्देश असे आहे की,

Read More »

Latest News