1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राष्ट्रपतींच्या हस्ते तिसरे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान

The President, Shri Ram Nath Kovind addressing at the presentation of the 3rd National Water Awards, in New Delhi on March 29, 2022.
Spread the love

नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज जल व्यवस्थापन क्षेत्रातील अनुकरणीय कार्यासाठी राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर दैनंदिन जीवनात तसेच आपल्या धरेवर पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जल मोहिमेचा विस्तारही करण्यात आला.

‘जल शक्ती अभियान: वर्षा जलसंधारण (कॅच द रेन) 2022’ ची सुरुवात करताना करताना खूप आनंद होत आहे असे प्रतिपादन राष्ट्रपतींनी केले. जलसंधारणाच्या कामात प्रत्येक व्यक्तीचा सक्रिय सहभाग असावा यासाठी स्थानिक जनतेला प्रेरित करण्याकरता जिल्हा दंडाधिकारी आणि गावच्या सरपंचांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे असेही ते म्हणाले.

निसर्गाने मानवाला जलस्त्रोतांचे वरदान दिले आहे. त्याने आपल्याला विस्तीर्ण नद्या दिल्या आहेत, त्यांच्या काठावर महान संस्कृतींचा विकास झाला. भारतीय संस्कृतीत नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व असून त्यांची माता म्हणून पूजा केली जाते. उत्तराखंडमधील गंगा आणि यमुना, मध्य प्रदेशातील नर्मदा आणि बंगालमधील गंगा-सागर या नद्या, आपण पूजेसाठी समर्पित ठिकाणे ठेवली आहेत.

अशा धार्मिक प्रथा आपल्याला निसर्गाशी जोडून ठेवतात. तलाव आणि विहिरींचे बांधकाम हे पुण्यपूर्ण कार्य मानले जात असे. दुर्दैवाने आधुनिकता आणि औद्योगिक अर्थव्यवस्थेच्या आगमनाने आपण निसर्गाशी असलेला संबंध गमावला आहे. ज्या निसर्गाने आपल्याला टिकवून ठेवले आहे त्यापासून आपण तुटलो आहोत असे आढळते.

Claim Free Bets

आपल्या देशात जगाच्या लोकसंख्येपैकी 18 टक्के लोकसंख्या आहे, तर आपल्याकडे फक्त 4 टक्के गोड्या पाण्याचे स्रोत आहेत. पाण्याची उपलब्धता अनिश्‍चित आहे आणि ती बऱ्याच अंशी पावसावर अवलंबून असते, याचा परिणाम शेतकरी, महिला आणि गरिबांच्या जीवनावर होत आहे असे राष्ट्रपती म्हणाले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पंजाबात राजकीय संकट; अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

    September 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveगुजरात पाठोपाठ आता पंजाबमध्येही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांन...

    दहा वर्षात देशातील झोपडपट्ट्यांच्या संख्येत घट

    March 25th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशाच्या शहरी भागात राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने केलेल्या झोपडपट्ट्यांच्या सर्वेक्षणाच्या 58 व्या ...

    ‘वसुली प्रकरणात अनिल देशमुख फसवले गेले’

    November 10th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveप्रकाश आंबेडकर यांचा दावा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटी वसुली प्रकरणात फसवल्याचं दिसत ...