1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आरोग्य विभागाच्या परीक्षेत परत घोळ; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

Health despartment exams
Spread the love

राज्यातील आरोग्य विभागाच्या पदांवर भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता या परीक्षा दिनांक २४ ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. पण परीक्षेच्या या नवीन तारखांची घोषणा करताच समस्या उभा झाल्या आहे. कारण ३१ ऑक्टोबरला आरोग्य विभागाची भरती परीक्षा आणि शिक्षक पात्रता परीक्षा या दोघांचाही परीक्षा एकाच दिवशी आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

यावर प्रतिक्रिया देतांना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले कि, “३१ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभाग आणि शिक्षक पात्राता परीक्षा एकत्र आल्या आहेत. मी याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी बोललो आहे. आरोग्य विभागाची परीक्षा तातडीची आहे, त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखेबाबत विचार करावा, अशी विनंती मी केली आहे”, असे टोपे म्हणाले. यातून मार्ग काढला जाईल आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल असेही ते पुढे म्हणाले.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट- क आणि गट- ड साठी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लेखी परीक्षा घेण्याचे काम मे. न्यासा या संस्थेला देण्यात आले होते. त्या संस्थेने आम्हाला पूर्वतयारीसाठी आणखी वेळ हवा आहे, असे म्हणत ऐनवेळी परीक्षा घेण्यास नकार दिला. पण आता परत परीक्षा घेण्याचे काम सरकारने न्यासा कंपनीला दिले आहे. या कंपनीचा पूर्वइतिहास वादाचा आहे. पंजाब परीक्षेकरिता नीट काम न केल्या बद्दल या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले होते.

Claim Free Bets

कोरोना काळात काम करण्यासाठी आरोग्य विभागास अधिक सक्षम करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. त्याकरिता मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागात भरती करण्याकरिता शनिवार २५ सप्टेंबर आणि रविवारी २६ सप्टेंबर रोजी शासनाकडून परीक्षा घेण्यात येण्यात होती. पण ती रद्द करण्यात आली होती.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    शेतकऱ्यांनी दिली ‘भारत बंद’ची हाक

    September 27th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveशेतकरी बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवरील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. ४० शेतकरी संघटनांचे प्रतिनिधि...

    शेतपिकांच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख रूपये मंजू...

    October 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. यात शेतपि...

    अनेक राज्यात शाळेची घंटा वाजली

    September 1st, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveदेशात कोरोनाचे केसेस कमी झाल्याने अनेक राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पंजाब, हरयाणा, ...