1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

सावधान.!! पुढच्या ५ तासात चक्रीवादळ धडकणार; राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

Spread the love

या महिन्यात महाराष्ट्रातील सर्वच भागात चांगला पाऊस झाला. मराठवाड्यासह नाशिक, उत्तर महाराष्ट्र या भागात गंभीर पूरस्थिती देखील निर्माण झाली होती. तर गेल्या दोन वर्षात निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळाचा राज्याला तडाखा बसला आहे. याचा सर्वाधिक फटका कोकण आणि गुजरातला बसला होता. आता आणखी देशावर आणखी एका चक्रीवादळाचं संकट राज्यावर घोंघावत आहे.

पुढच्या 5 तासात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून चक्रीवादळ (cyclonic storm) होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी आणखी तीव्र होईल. तसेच आगामी ५ तासात याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुढील २४ तासांत ते ओडिशा
किनाऱ्याजवळ सरकेल. परिणामी, याचा प्रभाव म्हणून राज्यात पुढील चार ते पाच दिवस गडगडाटासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषत: रविवारपासून पावसाचा जोर वाढेल. यंदा मान्सूनच्या परतीच्या प्रवासालाही विलंब झाल्याचे होसाळीकर यांनी सांगितले. राजस्थानमधून पाऊस आपला परतीचा प्रवास विलंबाने सुरू करणार आहे. जवळपास ७ ते ८ ऑक्टोबरच्या आसपास मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू करेल, असेही त्यांनी सांगितले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राणेंचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणारे सुधाकर...

    August 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याबद्दल केंद्रीय सूक्ष्म, मध्यम आणि ...

    ‘उघडले देवाचे दार..!!’ राज्यमंत्री दत्ता...

    October 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआजपासून सर्व देवांची बंद असलेली दारे उघडण्यात आली आहे. मागील वर्षीपासून असलेल्या कोरोना संकटामुळे मंदिर बंद...

    देशभरात उद्यापासून कॉंग्रेसचे ‘जेलभरो’; ...

    October 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खीरीमध्ये राज्यातील मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलन केले जात असताना त्यांना...