1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘भाजप नेत्यांची यादी देतो, त्यांच्यावर ईडी कारवाई करणार का’?; जयंत पाटलांचा संतप्त सवाल

Jayant Patil
Spread the love

महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीतील विविध नेत्यांना ईडीच्या नोटीस येतायत. यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, हसन मुश्रीफ, अनिल परब, संजय राऊत, एकनाथ खडसे इत्यादी नेत्यांचा समावेश आहे. या पार्शभूमीवर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपमध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार?, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी जयंत पाटील अहमदनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधताना हा सवाल केला.

पुढे पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाला बदनाम करण्यासाठी ईडी, सीबीआय व आयटी यंत्रणांना हाताशी धरून भाजप कारवाई करण्यास सांगत आहे. याचवेळी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांच्या गैरकारभाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. असे असेल तर आम्हीही अशा नेत्यांच्या आणि त्यांच्या गुन्ह्यांची माहिती देऊ, त्यांच्यावर या यंत्रणांनी कारवाई करून दाखवावी,’ असे आव्हान जयंत पाटील यांनी दिले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    इंदापूर शिक्षक पतसंस्थेत कवयित्री निर्मला मचाले-पवार...

    September 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveइंदापूर;इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सणसर या अध्यक्ष चषक पुरस्कार प्राप्त शाळेच्या आदर्श ...

    सोमय्यावरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध न...

    September 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा काडीचाही संबंध नाही. ही ...

    शिवसेनेची गृहमंत्रीपदावर करडी नजर?

    April 2nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाविकास आघाडीतील गृहकलह चव्हाट्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाविरोधात न...