1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेने २४ हजार किमी अंतर पार केले

bjp jy
Spread the love

केंद्र सरकारचे नवीन नियुक्त ३९ केंद्रीय मंत्री यांची जन आशीर्वाद यात्रा २४ हजार किलोमीटर झाली आहे.

१५ ऑगस्ट २०२१ पासून सुरु झालेली यात्रा २८ ऑगस्ट २०२१ पर्यंत चालली असून, एकूण १४ दिवसांची हि यात्रा होती.

या यात्रेच्या दरम्यान जवळजवळ पाच हजार कार्यक्रम आयोजित केले गेले होते. भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एक विधान दिले होते की, जन आशीर्वाद यात्रेला देशातील प्रत्येक कोपऱ्यातून प्रेम आणि आशीर्वाद मिळाला. तसेच त्यांनी या वेळी विरोधी पक्षांवर देखील निशाणा साधला.

Claim Free Bets

आपल्या विधानात नड्डा यांनी म्हटले की, जन आशीर्वाद यात्रेच्या यशाला अनेक विरोधी पार्टीने अनेक विघ्न आणि अडथळे उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. पण मोदी सरकार आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा विश्वास डळमळला नाही.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा संदर्भ देत नड्डा म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीने गैरवर्तन केले आणि लक्ष्य केले ते आम्ही सर्व पाहिले.

नड्डा यांनी या घटनेला लोकशाहीवरील हल्ला म्हटले आणि जनतेच्या व्यापक पाठिंब्याने विरोधकांना विशिष्ट अजेंडा आणि विशिष्ट मानसिकतेसह मागे हटण्यास भाग पाडले.

देशवासियांनी विरोधकांच्या योजना फेटाळून विकासाच्या राजकारणावर विश्वास दाखवला आहे.

ते म्हणाले की, २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या प्रत्येक सदस्याचा प्रत्येक क्षण जनतेच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी समर्पित आहे.

देशातील जनतेचे आशीर्वाद पंतप्रधान, केंद्र सरकार आणि भाजपकडून सातत्याने मिळत आहेत.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मला आलेल्या ईडीच्या नोटीसीवर, लोकांनी भाजपाला येडं ठ...

    October 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. त्यावरुन...

    फ्लेचर पटेलचा समीर वानखेडेंशी काय संबंध?; नवाब मलिक

    October 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveफ्लेचर पटेल कोण आहे? फ्लेचर पटेल आणि समीर वानखेडे यांच्यात काय संबंध आहेत? अशी विचारणा करत पुन्हा एकदा राष्...

    महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा मिनी यूपीए प्रयोग : सं...

    December 7th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमहाराष्ट्रात महाविकास आघाडीचा हा मिनी यूपीएचा प्रयोग आहे, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त के...