1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

काबुल विमानतळावरील बॉम्बस्फोटाचे केरळच्या 14 लोकांशी संबंध

kabul bomb
Spread the love

अफगाणिस्तानातील काबुलच्या विमानतळाबाहेर झालेल्या दोन बॉम्बस्फोटांमधील मृतांची संख्या आता 85 इतकी झाली असून त्यात 13 अमेरिकन जवान आहेत ही बाब आज स्पष्ट झाली आहे. दरम्यान, इसिस या इस्लामिक दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली असल्याचे वृत्त आहे.

अशातच पुन्हा एक धक्कादायक माहितीनुसार आली आहे की,’या संघटनेमध्ये केरळमधील १४ जणांचा समावेश आहे. तालिबानने बगराम जेलमधून या सर्वाना मुक्त केले होते. तसेच तुर्कमेनिस्तानच्या दुतावासावर हल्ल्याचा प्रयत्न करत असलेल्या दोन पाकिस्तानींना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

२०१४ मध्ये मोसूलमध्ये इस्लामिक स्टेटचा कब्जा झाल्यानंतर मलप्पुरम, कासरगोड आणि कन्नुर जिल्ह्यातील एक समूह भारत सोडून गेला होता. तेव्हा यातील काही कुटुंबांनी आयएकेपीमधून अफगाणिस्तानमधील नंगरहार प्रांतात राहू लागले होते. यांचा वापर करून तालिबान आणि त्यांचे सहकारी भारताच्या प्रतिमेला नुकसान करू शकतात.

दरम्यान, विमानतळाबाहेर दोन बॉम्बस्फोटांबरोबरच गोळीबाराचाही प्रकार घडला होता. घाईगडबडीने काबूलमधून बाहेर पडण्यासाठी विमानतळावर गर्दी केलेले अनेक जण यात बळी पडले आहेत. तेथे सुरक्षा बंदोबस्ताला असलेले अमेरिकन जवानही यात बळी पडल्याने अमेरिकेचे स्थानिक सुरक्षा अधिकारीही धास्तावलेले दिसून आले. ठार झालेल्यांमध्ये तालिबानचेही 28 जण आहेत असे सांगण्यात येते.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    दिलासादायक.!! द.आफ्रिकेत ओमिक्रॉनचा जोर ओसरला

    December 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकरोनाचे नवे व्हेरीयंट ओमिक्रॉन प्रथम आढळलेल्या द.आफ्रिका देशातून एक दिलासादायक बातमी आली आहे. देशात ओमिक्रॉ...

    ओमिक्रॉनवर प्रभावी फायझरच्या गोळीला आपत्कालीन मंजुरी

    December 17th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveयुरोपियन युनियनच्या औषध नियामक विभागाने कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटशी दोन हात करणाऱ्या फायझरच्या को...

    तालीबानी ‘हा’ नेता बनणार अफगाणिस्तानचा प...

    September 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तालिबांनी आता अफगाणिस्तानमध्ये आपले सरकार प्रस्थापित करणार आहे...