1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

ब्राऊझर Google Chrome चा लोगो बदलला !असा असेल लोगोमधील बदल

Spread the love

नागपूर: जगभरात लोकप्रिय असलेले इंटरनेट ब्राऊझर Google Chrome याचा लोगो ८ वर्षांनी बदलला गेला आहे. आता Google Chrome चा लोगो अगदी नवीन डिझाईनमध्ये बघायला मिळेल. याआधी कंपनीने २०१४ मध्ये Chrome च्या डिझाईनमध्ये बदल केले होते. यावेळेस Chrome मध्ये केलेल्या बदलमुळे लोगो अगदी ठळक आणि आणि अजून आकर्षक दिसून येईल.

( Google Chrome )गुगल क्रोमच्या नवीन लोगोबद्दल (Google Chrome Logo)बोलायचे झाले तर तुम्हाला त्यात थोडा बदल दिसेल. जुन्या लोगोची ग्रीन सेंटर सीमेवर थोडे गडद हिरवा रंग होता, ते बदलानंतर काढून टाकण्यात आले आहे. नवीन लोगोमध्ये तुम्हाला लाल, पिवळे आणि हिरवे रंग अधिक स्पष्ट आणि सपाट दिसतील. मध्यभागी असलेला निळा रंग आता पूर्वीपेक्षा जास्त गडद दिसतो. Chrome मधील सर्व रंग आता पूर्वीपेक्षा गडद झाले आहेत.

एका डिझायनर एल्विन ने क्रोमच्या नवीन लोगोबद्दल ट्विट करून माहिती शेअर केली आहे. ज्यामध्ये नवीन लोगोची अनेक झलक दाखवण्यात आली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘गुगल क्रोमच्या कॅनरी व्हर्जनच्या अपडेटमध्ये तुमच्यापैकी काहींना आज नवीन लोगो दिसला असेल. होय! आम्ही आठ वर्षांत प्रथमच Google Chrome चे ब्रँड आयकॉन बदलत आहोत. नवीन लोगो लवकरच तुमच्या डिव्हाइसवर दिसण्यास सुरुवात होईल.”

आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या हा नवीन लोगो फक्त गुगल क्रोमच्या कॅनरी व्हर्जनवरच दिसतो, पण लवकरच हा बदल गुगल क्रोमच्या स्टँडर्ड व्हर्जनवरही दिसेल. गुगल क्रोमच्या नवीन लोगोमध्ये कोणतीही शॅडो नाही. यामध्ये वापरलेले रंग अधिक तेजस्वी असून त्यांचे प्रमाण वेगळे आहे. क्रोमच्या जुन्या लोगोच्या तुलनेत नवीन लोगोमध्ये मध्यभागी निळे वर्तुळ मोठे करण्यात आले आहे. नवीन लोगो उपकरणानुसार तयार करण्यात आला आहे. Google Chrome च्या 100 आवृत्तीसह, नवीन लोगो सर्व उपकरणांवर दृश्यमान होईल.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    FB, Whatsapp डाऊन झाल्याने टेलिग्राम ला कोट्यावधींचा...

    October 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसोमवारी संध्याकाळी असे काही घडले ज्यामुळे जगभरातील लोकांना आश्चर्य वाटले. वास्तविक फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स...

    फेसबुक बनणार ‘मेटा’

    October 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love सोशल मिडिया मधील दिग्गज आणि गेले काही दिवस सातत्याने वादात असलेल्या फेसबुकच्या नावात बदल केला जात असल्याची...

    गुगलने जारी केले Chrome OS चे अपडेट; जाणून घ्या संपू...

    January 11th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveजगभरातील सर्व वापरकर्त्यांसाठी अनुभव आणखी चांगला करण्यासाठी Google ने स्टेबल Chrome OS 97 अपडेट आणण्यास सुर...