The Free Media

Sanjay Chhabria

मुंबई – रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाबरिया यांना येस बँक-डीएचएफएल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आज सीबीआयने मुंबई अटक केली आहे. त्यांना उद्या शुक्रवारी मुंबईतील सीबीआयच्या विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण?

संजय छाबरिया यांच्या संबंधित ठिकाणे फेब्रुवारीमध्ये सीबीआयने रेडियस डेव्हलपर्सशी संबंधित 6 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. रेडियस डेव्हलपर्स हे कर्जबाजारी दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे ​​सर्वात मोठे कर्जदार होते. सीबीआय येस बँकेचे माजी सहसंस्थापक राणा कपूर आणि डीएचएफएल लिमिटेड यांची मार्च 2020 पासून चौकशी करत आहे. रेडियस डेव्हलपर्सकडे डीएचएफएलचे 3000 कोटींहून अधिक कर्ज होते. रेडियस ग्रुप हा DHFL च्या सर्वात मोठ्या कर्जदारांपैकी एक होता.

या ग्रुपने मुंबईतील एका निवासी प्रकल्पासाठी कर्ज घेतले होते. रेडियस ग्रुपचे कर्ज आणि व्याज तब्बल 3 हजार कोटी रुपये होते. गेल्या आठवड्यात अंमलबजावणी संचालनालयाने येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रोमोटर्स कपिल आणि धीरज वाधवन यांनी संशयास्पद व्यवहारांद्वारे 5 हजार 50 कोटी रुपयांच्या निधीची उधळपट्टी केल्याचा आरोप केला होता. ईडीने म्हटले होते की येस बँकेने एप्रिल 2018 ते जून 2018 दरम्यान डीएचएफएलकडून 3 हजार 700 कोटी रुपयांचे डिबेंचर खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे ही रक्कम डीएचएफएलकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर डीएचएफएलने डीओआयटी अर्बन व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडला 600 कोटी रुपयांचे कर्ज दिले.

Share on Social media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
Share on email
Email

Related Post

uddhavthackery-cm-thefreemedia

विधानसभेत बहुमत सिद्ध करा; राज्यपालांचा आदेश

नागपूर: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक मोठी बातमी आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकारनं बहुमत गमावलं

Read More »
chip technology-thefreemedia

आर्मने (Arm )स्मार्टफोन गेम्ससाठी नवीन चिप तंत्रज्ञान लाँच केले

नागपूर: सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पच्या मालकीची ब्रिटीश चिप टेक्नॉलॉजी फर्म आर्म लिमिटेडने (Arm Ltd) मंगळवारी नवीन चिप तंत्रज्ञानाच्या संचाचे अनावरण केले ज्याचा उद्देश असे आहे की,

Read More »
thumbnail-thefreemedia

‘आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाहीत’; गुलाबराव पाटील

खासदार संजय राऊतांना गुलाबरावांचे प्रत्युत्तर गुवाहाटी: शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. गुलाबराव पाटलांना पुन्हा टपरीवर नाही

Read More »

Latest News