1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“खुर्ची कधी जाईल या भीतीने मुख्यमंत्री दु:खी”; गडकरीचा टोला

nitin gadkari
Spread the love

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. सोमवारी राजस्थानमध्ये एका कार्यक्रमा दरम्यान नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार टोलेबाजी केली. नितीन गडकरींच्या या टोलेबाजीवरुन सभागृहात एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं. खुर्ची कधी जाईल या भीतीने मुख्यमंत्री दु:खी असतात असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं आहे. विशेष म्हणजे नितीन गडकरींचे हे विधान अशा वेळी आले आहे ज्यावेळी भूपेंद्र पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत होते.

नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?

नितीन गडकरी जाहीर कार्यक्रमात म्हणाले, आजकाल प्रत्येकाला काही ना काही समस्या आहेत प्रत्येकजण दु:खी आहे. मंत्रिपद न मिळाल्याने आमदार दु:खी आहेत. चांगले खाते न मिळाल्याने मंत्री दु:खी आहेत. तर जे मुख्यमंत्री बनले आहेत ते सुद्धा दु:खी आहेत याचं कारण म्हणजे कधी मुख्यमंत्री पद जाईल याची त्यांना भीती सतावत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ताफ्यात अज्ञात कार शिरली

नितीन गडकरी हे राजस्थान विधानसभेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या वेळी ते म्हणाले, राजकारणाचा मुख्य उद्देश हा सामान्य नागरिकांच्या आयुष्यात बदल घडवून आणणे आहे. परंतु आजकाल ते केवळ सत्ता मिळवण्यासाठी असल्याचं पाहिजे जात आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीला लाभ मिळवून देणे हा मुख्य उद्देश लोकशाहीचा आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात खुनाचा थरार

    November 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभावी डॉक्टराची निर्घृण हत्या यवतमाळ येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयातील एम बी बी एस च्या...

    महारष्ट्रात ऑपरेशन लोटसला सुरवात ?

    June 24th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: महाविकास आघाडीमधून (Mahavikas Aghadi) शिवसेना (Shivsena) बाहेर पडण्यासाठी तयार असल्याचं वक्तव्य संज...

    राज्यातील शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरु होणार; मुख्यमंत्...

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला असून 4 ऑक्टोबर पासून शाळा सुर...