बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांचे संकल्पित उद्दिष्ट
हिंगणा:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक महिन्याचे अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम बार्टी समतादूत मार्फत- निर्मित युवागटांना एम.सी.ई.डी उपकेंद्र एमआयडीसी हिंगणा येथे दिनांक ६ जून २०२२ ते १३ जुलै २०२२ या कालावधीत ३० प्रशिक्षणार्थी एक प्रशिक्षण वर्ग, अश्या दोन प्रशिक्षण वर्गला ईडीपी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन एम.सी.ई.डी उपकेंद्र एमआयडीसी हिंगणा येथे पार पडला.
सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी हृदय गोडबोले समतादूत जिल्हा प्रकल्प अधिकारी नागपूर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा प्रदान केल्या. तर विशेष उपस्थित आलोक मिश्रा विभागीय अधिकारी एम.सी.ई.डी. नागपूर प्रमुख उपस्थित हेमंत वाघमारे राज्य समन्वयक तथा केंद्र प्रमुख एमसीईडी हिंगणा, नागपूर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांचा उद्योग उभा होत पर्यंत एम.सी.ई.डी व बार्टी पाठपुरावा करून नवउद्योजक घडवन्यासाठी मदत करेल असे प्रशिक्षणार्थ्यांना आश्वाशीत करून शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे अतिथी म्हणून हिंगणा तालुका समतादूत सतीश सोमकुंवर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना संबोधित केले की, उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या अंगी उद्योजक्ता कौशल्य प्राप्त झाले असून स्वत:चा उद्योग उभारणी साठी आपल्या मेहनत करावी लागले. आपल्या मदतीला बार्टी व एम.सी.ई.डी. आपल्या सोबत आहे. आपण उद्योजक बनून इतरांसाठी प्रेरणा ठराल आणि बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या संकल्पित उद्दिष्ट आपण पूर्ण कराल अशी आशा बाळगुन शुभेच्छा व्यक्त केल्या. कलावती खैर विभागीय लेखा अधिकारी नागपूर यांनी सुद्धा शुभेच्छापर नव उद्योजकांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रशिक्षणार्थी प्रतिनिधी म्हणून रितेश खोब्रागडे, प्रशांत तागडे, वैशाली वैद्य, गौरव शिंदे, रीता शिर्के या प्रशिक्षणार्थ्यांनी आपले मनोगत वक्त करतांना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि एम.सी.ई.डी कडून युवा गटासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने युवा गट सदस्यांना उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड करून ही संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल आम्ही सर्व गट सदस्य बार्टी व एमसीईडीचे ऋणी आहोत. या प्रक्षिक्षण कार्यक्रमातून आम्हाला उद्योग व्यवसायाचे संपूर्ण तज्ञांकडून मार्गदर्शन मिळाले.
त्यामुळे आम्ही येत्या दिवसांत आपला उद्योग उभारुन स्वत:च्या उद्योगाचे मालक बनणार इतका आत्मविश्वास या प्रशिक्षणातुन आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे बार्टीने अशाप्रकारचे कार्यक्रम पुढे ही सुरू ठेवून सुशिक्षित बेरोजगार यांना स्वत:चा रोजगार निर्माण करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त करत विशेषता: बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये यांचे व हेमंत वाघमारे राज्य समन्वयक तथा केंद्र प्रमुख एमसीईडी हिंगणा, उपक्रमांबद्दल धन्यवाद मानले. कार्यक्रमाला एम.सी.ई.डी. चे समन्वयक संगीता ढोने विपिन लाढे, सुषमा चोरपागर, पंकज ठाकरे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत तागडे तर आभार रीता शिर्के यांनी मानले.