1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राज्यात कोरोनाचा उद्रेक; निर्बंध नको असतील तर, शिस्त पाळा: मुख्यमंत्री ठाकरे

covid cases-thefreemedia
Spread the love

मुंबई: राज्यात कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील, तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. वर्षा निवासस्थानी असलेल्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते.

प्रारंभी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील कोविड विषाणूच्या संसर्गाबाबत सविस्तर माहिती दिली. १६ एप्रिल २०२२ रोजी राज्यात सर्वात कमी ६२६ सक्रिय रुग्ण होते. आज दीड महिन्यात त्यात सात पटीने वाढ झाली असून ती संख्या ४५०० वर गेली आहे असे सांगून आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या ९७ टक्के रुग्ण आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर ६ टक्के असून राज्याचादेखील वाढून ३ टक्के झाला आहे असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोविड आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन पुढील पंधरा दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. कोविडचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी कोविड व्यवहार करण्यावर भर दिला पाहिजे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

Claim Free Bets

ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तात्काळ कोविड चाचणी करुन घ्या

गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरावा

बारा ते अठरा वयोगटातील लसीकरण वाढवा.

ज्येष्ठ, सहव्याधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, बूस्टर लस घ्यावी

आरोग्य व्यवस्थेने पायाभूत सुविधांची तयारी करुन ठेवावी

ऑक्सिजन, औषधे यांचा साठा करुन ठेवावा.

येणाऱ्या पावसाळ्यामुळे जलजन्य आजारदेखील डोके वर काढतात, त्यांची लक्षणे कोरोना सारखीच असल्याने डॉक्टरांनीदेखील अशा रुग्णांना वेळीच चाचण्या करून घेण्यास सांगावे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    “कितीही अटक केली, ताब्यात घेतलं हुकूमशाही केली, तरी ...

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउद्धव ठाकरेंची मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही; आमदार रवी राणा राज्यात अनपेक्षित घडलेल्या ओल्या दुष्...

    राष्ट्रपतींच्या हस्ते तिसरे राष्ट्रीय जल पुरस्कार प्...

    March 30th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज जल व्यवस्थापन क्षेत्रातील अनुकरणीय कार्यासाठी राष्ट्...

    वडोदराला जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये ठरल की संजय...

    June 27th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: आज शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीचे सम्सन आले. त्यावेळी मीडियाशी बोलतांना संजय राऊत म्हणालेत की...