The Free Media

covid cases-thefreemedia

मुंबई: राज्यात पुन्हा चौथ्या लाटेचे संकेत दिसून येत असून, कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढतोय की काय असे कालच्या आकड्यावरून लक्षात येत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा काही जिल्ह्यातून कालपर्यंत कमी होत असल्याचे दिसत असतानाच , राज्यात तब्बल 4024 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. ज्या प्रकारे राज्यातील आकडा भीतीदायक आहे त्याचप्रकारे मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडाही कमालीचा वाढला आहे. आरोग्य विभागाने आज कोरोना रुग्णांचा अहवाल जाहीर करताच आरोग्य अधिकाऱ्यांसह राज्य सरकारचं टेन्शन दुप्पट वाढलं आहे. मागील आठवड्यातही कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपचार आणि लसीकरणावर भर देण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि आरोग्य खात्याकडूनही देण्यात आल्या होत्या.

कोरोनाची 36 टक्क्यांनी वाढ


राज्यात बुधवारी 4024 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारच्या आकडेवारीपेक्षा हा आकडा 36 टक्क्यांनी वाढलाह होता, कोरोनाबाधितांचा हा आकडा वाढला असला तरी मृत्यूदर प्रमाण मात्र कमीच राहिले आहे, या काळात कोरोनाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पाच महिन्यानंतर विक्रमी नोंद


राज्यातील ही आकडेवारी वाढत असतानाच मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या पाच महिन्यानंतर विक्रमी नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील आरोग्य यंत्रणावरही याचा ताण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तरी मृत्यूदर कमी


महाराष्ट्रातील आजचा आकडा हा 4024 होता तर बुधवारी 2293 नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढली असली तरी मृत्यूदर कमी असून या काळात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. जानेवारी महिन्याच्या 23 तारखेनंतर ही एवढी रुग्णसंख्या पहिल्यादांच समोर आली आहे.

बी. ए. 5 व्हेरिएंटचे संक्रमण


बीएमसीच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी बी. ए. 5 व्हेरिएंटचे संक्रमण झालेले एकूण चार रुग्ण सापडले आहेत. हे रुग्ण सापडले असले तरी त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

प्रशासन आता खडबडून जागे
एका दिवसात कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद झाल्यामुळे आरोग्य प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे. रुग्णांची काळजी घेण्यासाठी आता बीएमसीने जंबो कोविड सेंटर मेडिकल स्टाफसह सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

Share on Social media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
Share on email
Email

Related Post

thumbnail-wordpress-thefreemedia

महाराष्ट्र: केमिस्टच्या हत्येचा आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले, एनआयएने सुरू केला तपास

नागपूर: महाराष्ट्रातील अमरावती येथे 21 जून रोजी गळा चिरून केमिस्टच्या हत्येप्रकरणी एनआयएने तपास सुरू केला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

Read More »
uddhav-thackeray-thefreemedia

उस्मानाबादच्या नामकरणावरून राष्ट्रवादीच्या ४० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

उस्मानाबाद: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायच्या आधी शहरांचे नामांतर केले. औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव नगर असे केले. औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी

Read More »

नागपुरात पहिल्यांदयाच LGBTQ+ प्राईड महिना (Pride Month) The Free Media आणि Click2Media कडून साजरा करण्यात आला

नागपूर: जून महिना हा LGBTQ प्राईड महिना (Pride Month) म्हणून ओळखला जातो. ह्याच महिन्याचा अजून आनंद वाढवायला द फ्री मीडिया (The Free Media) आणि Click2Media

Read More »

Latest News