1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर

Spread the love

देशात नवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. राज्यसभेचे २५६ वे अधिवेशन ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यात ८ एप्रिल पर्यंत चालणार आहे. याआधी सोमवारी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या महासचिवांना आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरक्षित संचालनसाठी उपाययोजना सुचवण्याचे निर्देश दिले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्ष या दोघांनी सेक्रेटरी-जनरल यांना प्रचलित परिस्थितीत मागील हिवाळी अधिवेशनातील कोविड प्रोटोकॉलचा आढावा घेण्याचे आणि या संदर्भात लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होत आहे. यामध्ये राष्ट्रपतींचे अभिभाषण होते आणि १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला जातो. साधारणत: अर्थसंकल्पीय अधिवेशन मे महिन्यापर्यंत दोन टप्प्यांत चालते. राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प यावर चर्चा केली जाते आणि त्यानंतर सर्व पक्षांच्या मदतीने ते पारित केले जाते.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    #Breaking I कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्ष सोडला

    May 25th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी आज आपण काँग्रेसचा राजीनामा दिला असून सपाच्या पाठिंब्याने अपक...

    देशभरात 75 दिवस 75 समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहिम...

    June 17th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: केंद्रीय राज्य मंत्री (स्वतंत्र कार्यभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र कार्...

    माजी क्रिकेटपटू इम्रान खानची बीसीसीआयवर आगपाखड

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबीसीसीआय जागतिक क्रिकेटवर इतके वर्चस्व गाजवत आहे की त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणताही देश जाणार नाही. मात्...