The Free Media

कोल्हापूर येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे येथे एक किसळवाणा प्रकार उघडकीस आला आहे. विनापरवाना शस्त्रासह शिकारीसाठी घुसलेल्यांनी माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट केली आहे. संशयित आरोपीचे मोबाईल तपासले असता हा प्रकार उघडकीस आला आहे. या आरोपींनी केलेला घृणास्पद प्रकार मोबाईलमध्ये पुरव्यासह असला तरी कोणता गुन्हा नोंद करायचा हा प्रश्न वनविभागाच्या समोर उभा राहिला आहे. या प्रकरणी संदीप तुकाराम पवार, मंगेश जनार्दन कामतेकर, अक्षय सुनिल कामतेकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असून त्यांनी आपला गुन्हा कबुल केला आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तिघे कोकणातून कोल्हापुरातील चांदोलीमध्ये शिकारीसाठी आलेले होते. संशयित आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून एका धक्कादायक माहितीचा खुलासा झाला आहे. या आरोपीनी एका घोरपडीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आता या आरोपींवर कोणत्या कलमाखाली कारवाई करायची यावर वन अधिकारी चर्चा करत आहेत.

व्याघ्र गणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कमेर्‍यामुळे या शिकारींना अटक करण्यात वनविभागाला यश मिळालं होतं. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या आरोपींचे मोबाईल तपासले असता हा प्रकार उघडकीस आला आहे. यातील एका आरोपीने घोरपडीवर बलात्कार केला असून त्यावेळचे चित्रिकरण मोबाईलमध्ये करण्यात आले होते. आता त्यावरुनच या आरोपींवर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र वनविभागासमोर एकच प्रश्न आहे तो म्हणजे या आरोपींवर कोणत्या कलमांखाली गुन्हा नोंद करायचा. एखादा शिकारी आला तर, त्याने शिकार केली तर त्याच्यावर कोणत्या कलमांतर्गत कारवाई करायची हे ठरलेलं असतं. पण आता वन्यप्राण्यावर बलात्कार केल्यामुळे कशी कारवाई करायची हा पेच वन्य अधिकाऱ्यांसमोर आहे.

Share on Social media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
Share on email
Email

Related Post

thumbnail-wordpress-thefreemedia

महाराष्ट्र: केमिस्टच्या हत्येचा आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले, एनआयएने सुरू केला तपास

नागपूर: महाराष्ट्रातील अमरावती येथे 21 जून रोजी गळा चिरून केमिस्टच्या हत्येप्रकरणी एनआयएने तपास सुरू केला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

Read More »
uddhav-thackeray-thefreemedia

उस्मानाबादच्या नामकरणावरून राष्ट्रवादीच्या ४० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

उस्मानाबाद: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायच्या आधी शहरांचे नामांतर केले. औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव नगर असे केले. औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी

Read More »

नागपुरात पहिल्यांदयाच LGBTQ+ प्राईड महिना (Pride Month) The Free Media आणि Click2Media कडून साजरा करण्यात आला

नागपूर: जून महिना हा LGBTQ प्राईड महिना (Pride Month) म्हणून ओळखला जातो. ह्याच महिन्याचा अजून आनंद वाढवायला द फ्री मीडिया (The Free Media) आणि Click2Media

Read More »

Latest News