1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘तुम्ही राज ठाकरेंच्या नादी लागू नका, अन्यथा..’, रामदास आठवलेंचा भाजपला इशारा

ramdas athavale
Spread the love

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागला आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईमध्ये हिंदुत्वाच्या मुद्याने डोके वर काढले असून, आता मनसे पाठोपाठ भाजप देखील आघाडीवर आहे. राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मनसे आणि भाजप युतीसाठी हात मिळवणीची चर्चा जोरात सुरू आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आगामी काळातील अयोध्या दौरा झाल्यानंतर युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसे पालिका निवडणुकीत आम्ही पूर्ण तयारीशी उतरणार आहोत. राज ठाकरे यांना अयोध्या भेटीचे आमंत्रण मिळाले आहे. तसेच ते हा दौरा करणार आहेत. त्या दौऱ्यानंतर युती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्ष भाजपाला इशारा दिला आहे. ‘भाजपाने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये, भाजपाला मनसेमुळे नुकसान होऊ शकते’, असे मत त्यांनी व्यक्त केल आहे.

‘भाजपाला आरपीआय असताना मनसेची गरज नाही. मनसेमुळे भाजपाचे नुकसान होऊ शकतं. त्यांचा परप्रांतीय मुद्दा बघून भाजपाने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये. आम्ही भाजपाचा नाद सोडला, तर ते आमचा नाद सोडणार नाही’ असा सूचक इशारा रामदास आठवले यांनी भाजपाला दिलाय.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री हे विश्वास ठेवावा ...

    November 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमागील काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू ला...

    “आम्ही गांधीजींना सोडलं नाही, मग तुम्ही कोण ?&...

    September 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकर्नाटक हिंदू महासभेचे सचिव धर्मेंद्र यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि भाजपसंदर्भात वादग्रस्त...

    बिगर नेट, सेट अध्यापकांना सेवानिवृत्तीचे लाभ

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातील अकृषी विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील बिगर नेट तसेच सेट अध्यापकांना निवृत्तीवेत...