1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका : चित्रा वाघ

Spread the love

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या आणि अखेर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे नाव निश्चित झाले आहे आणि यावरूनच आता, अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ बसवू नका, असा जोरदार वार भाजपच्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच नाव न घेता खोचक टीका केली आहे. आज त्याच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. पण आज १४ ऑक्टोबर रोजी चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून रुपाली चाकणकर यांच्यावर घणाघाती वार केला आहे.

महिला आयोगाचा अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, असा हल्ला चढवत जर चाकणकर यांची निवड झाली तर प्रत्येकवेळी सरकारचे नाक कापले जाईल, असा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये चाकणकर यांचं नाव घेतले नाही. पण रात्रीपासून महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकर यांची निवड निश्चित झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे जरी चित्रा वाघ यांनी नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख चाकणकरांकडे आहे, हे स्पष्ट आहे.

अनेकवेळा चित्रा वाघ आणि चाकणकर यांच्यात वादाचे चक्र सुरु असते. आता महिला आयोगाच्या अधिकृत घोषणा अगोदर चित्रा वाघ यांनी चाकणकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. याच्यामुळे पुढे आणखी वाद वाढणायची शक्यता दिसते आहे.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    टोपे साहेब, वसुलीचा आकडा ठरला नसल्यामुळे परीक्षा रद्...

    September 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्...

    मराठीचे शिलेदार संस्थेच्या ‘साहित्यगंध’ ...

    December 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातील ७१ साहित्यिक ‘साहित्यगंध’ पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या, तसेच म...

    अनिल देशमुख: मी गृहमंत्री असताना सचिन वाझेला सरकारी ...

    November 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. त्...