1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

जास्त काळ लिव्ह-इनमध्ये राहत असल्यास नाते लग्नासारखे होईल, वडिलोपार्जित संपत्तीत मुलांना वाटा मिळेल : SC

thumbnail-thefreemedia
Spread the love

नागपूर: सुप्रीम कोर्टाने सोमवारी सांगितले जर कोणी पुरुष आणि महिला अनेक काळापर्यंत जर सोबत राहत असेल तर याला एका लग्न सारखीच मान्यता दिली जाईल. तसेच त्यांना मुलगा/मुलगी झाल्यास त्यांना वडिलांची संपत्ती देणे आवश्यक आहे.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) लिव्ह इन रिलेशनविषयी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विवाहाशिवाय (live in relationship) जन्माला आलेल्या मुलांचाही वडिलांच्या संपत्तीत हक्क असल्याचे न्यायालयाने मानले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर स्त्री आणि पुरुष दीर्घकाळ एकत्र राहत असतील, तर ते लग्न मानले जाईल आणि या नात्यातून जन्मलेल्या मुलांनाही वडिलांच्या मालमत्तेत हक्क मिळेल.

सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्वाळा देताना केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. केरळ उच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये तरुणाला त्याच्या वडिलांच्या मालमत्तेत वाटेकरी मानले नव्हते. कारण त्याच्या पालकांचे लग्न झाले नव्हते. दोघांचे लग्न झाले नसले तरी दोघेही पती-पत्नीसारखे (live in relationship) दीर्घकाळ एकत्र राहत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्वाळा देताना स्पष्ट केले. अशा परिस्थितीत मूल दोघांचे असल्याचे डीएनए चाचणीत सिद्ध झाल्यास वडिलांच्या मालमत्तेवर मुलाचा पूर्ण हक्क असल्याचे मानले आहे.

Claim Free Bets

मुळ प्रकरण आहे तरी काय?

केरळमधील एका व्यक्तीने वडिलांच्या मालमत्तेत वाटा न मिळाल्याने उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. त्याने याचिका दाखल करताना म्हटले होते की, त्याला अनैतिक मुलगा सांगून वाटा वडिलांच्या संपत्तीत दिला जात नाहीये. केरळ उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले होते की, ज्या व्यक्तीच्या मालमत्तेवर तो दावा करत आहे, त्याच्या आईने त्याच्याशी लग्न केलेले नाही, अशा परिस्थितीत त्याला कौटुंबिक मालमत्तेचा हक्क समजता येणार नाही.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नारी शक्ती पुरस्कार’ वितरण सोहळा उद्या

    March 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रातल्या तीन महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार’ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, आ...

    भारतात २४ तासात ओमिक्रॉनचे १६,७६४ नवे रूग्ण

    December 31st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात शुक्रवारी गेल्या 24 दिवसांत 16,764 नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदवली गेली, तिसऱ्या दिवशी वाढ होऊन देशातील...

    दक्षिण भारतात पावसाचा हाहाकार; जनजीवन विस्कळीत

    November 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love28 जणांचा मृत्यू, 200 रेल्वे गाड्या रद्द मागील काही दिवसांपासून दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पावसाने ह...