The Free Media

फडणवीसांनी पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन

floods-thefreemedia

समुद्रपुर: विदर्भात मुसळधार पाऊस आहे. वर्धा जिल्ह्यात ढगफुटी झाली असून, याची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे.

अतिशय कठीण परिस्थितीमध्ये पूरग्रस्त लोकांना वाचवण्याचे काम यंत्रणा करत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात वर्ध्याला पुराचा फटका बसला असून शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत-जास्ती मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल. वर्धा जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झालीय. रात्री ढगफुटी झाल्यामुळे पावसामुळं अनेक गावांना पुरानं वेढलं आहे. शेकऱ्यांची पेरणी खूप मोठ्या प्रमाणात खराब झाली आहे. त्यामुळे आता लगेच पेरणी करणे शक्य नाही. तसेच रेस्क्यूच काम अतिशय वेगाने सुरु आहे. अत्यंत अवघड परिस्थितीतून लोकांना बाहेर काढण्यात येत आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले, देवळी तालुक्याच्या सोनोरा ढोक इथं सुद्धा पुराच्या पाण्यानं शिरकाव केला. अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. मागील दहा दिवसात दुसऱ्यांदा गावात पाणी शिरल्यानं नागरिक संकटात सापडले आहेत. नागरिकांकडून आता गावाचे पुनर्वसन करा, अशी मागणी केली जातं आहे. त्या सगळ्यांची नीट व्यवस्था करणार आहे, असे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. दरम्यान, विदर्भातील वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे.

Share on Social media

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Email

Related Post

Mark-Zukerberg

मार्क झुकरबर्गला सर्वात मोठा झटका

मुंबई: सोशल मिडीया नेटवर्कवर मेटाचा संस्थापक मार्क झुकरबर्गसाठी हे वर्ष कठीण ठरत आहे. तो आता जगातील 20 व्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहे. मेटा प्रमुख झुकरबर्ग

Read More »
cricket

नागपुरात क्रिकेट सामन्याच्या पाश्वभूमीवर देहव्यवसायासाठी आलेल्या दोन रशीयन तरूणींना अटक

नागपूर:आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना नागपुरात होत असून या पार्श्वभूमीवर रशियातून नागपुरात टुरिस्ट व्हिसावर आलेल्या दोन रशियन तरुणींना सदरमधील एका इंटरनॅशनल दर्जाच्या हॉटेलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही

Read More »
Dussehra-gathering

दसरा मेळाव्यास कुणालाही परवानगी नाही

सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली_ मुंबई: शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानात यंदा दसरा मेळावा घेण्यासाठी कोणालाही परवानगी मिळणार नाही अशी माहिती समोर

Read More »

Latest News