1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पृथ्वीबाहेरील पहिली ‘आईस्क्रीम पार्टी’

birthday
Spread the love

नासाच्या अंतराळवीर मेगन मॅकआर्थर यांनी त्यांचा ५० वा वाढदिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सोमवारी साजरा केला असून त्यानिमित्ताने पहिलीच आईसक्रीम पार्टी अंतराळ स्थानकात साजरी झाली. मेगन यांनी ट्विटरवर त्या संदर्भातले ३ फोटो शेअर केले आहेत. ट्विटर वर मेगन यांचे ५० हजार फॉलोअर्स आहेत.

मेगन म्हणतात, मला खूप आनंद झाला. यापूर्वी कधीच माझ्यासाठी कुणी स्पेस शिप पाठविले नव्हते. एक्सपिडीशन ६५ च्या चालक दल सहकाऱ्यांबरोबर बर्थ डे साजरा करते आहे. डिनर, केक आणि आईस्क्रीम असा मस्त बेत आहे. मेगन पृथ्वीपासून २६० मैल दूर असलेल्या अंतराळ स्थानकात एप्रिल मध्ये पोहोचली आहे. स्पेस एक्सच्या ड्रॅगन रॉकेटने या स्टेशनवर २१६० किलो सामानाची डिलीव्हरी नुकतीच पोहोचवली असून त्यात ताजी फळे, अवाकाडो, लिंबे, आईस्क्रीम व अन्य काही सामान होते. ड्रॅगन कार्गो शिपची आत्तापर्यंतची सर्वात मोठी डिलीव्हरी आहे.

नासाच्या माहितीप्रमाणे अंतराळ स्थानकात वाढदिवस साजरा करणारा पहिला अंतराळवीर सोविएतचा व्हिक्टर पॅटसॅव असून त्याने १९ जून १९७१ मध्ये त्याचा ३८ वा वाढदिवस अंतराळ स्थानकात साजरा केला होता. अंतराळात वाढदिवस साजरा करणारा पहिला अमेरिकन अंतराळवीर चार्ल्स पेटे कॉनराड हा आहे. त्याने २ जून १९७३ मध्ये स्कायलॅब मध्ये त्याचा वाढदिवस साजरा केला होता. जेनेट कावंडी ही अंतराळस्थानकात वाढदिवस साजरा करणारी पहिली महिला अंतराळवीर आहे. तिने १७ जुलै २००१ या दिवशी अंतराळ स्टेशनमध्ये वाढदिवस साजरा केला होता.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    युक्रेन हल्ल्याचा निषेध करणाऱ्या ठरावावर भारत तटस्थ

    February 26th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveरशिया आणि युक्रेतन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षानंतर संयुक्त राष्ट्रसंघांनी तत्काळ बैठक बोलावली. रशियाने य...

    अमेरिकेला शह देणारा ‘हा’ नेता होणार इराक...

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveइराकमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या निकाल आता हळू हळू समोर येत आहेत,या निवडणुकीत शिया धर्मगुरू मुक्तादा अल-सदर...

    युक्रेन हल्ल्यात ‘परकीय भाडोत्री’ ठार

    March 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकीवने दावा फेटाळला कीव [युक्रेन]: रशियाने पश्चिम युक्रेनमधील यावोरिव्ह लष्करी प्रशिक्षण मैदानावर केलेल्या क...