The Free Media

thumbnail-thefreemedia

नागपूर: महाराष्ट्र राज्य कृषी विभाग समन्वय महासंघाच्यावतीने नागपूर येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय नागपूर ची जीर्ण इमारत ऐवजी नवीन इमारत बांधण्यास निधी मिळण्यात यावा याकरिता महामहीम राज्यपाल (महाराष्ट्र राज्य ) मुख्यमंत्री, वित्तमंत्री, कृषीमंत्री, कृषी राज्यमंत्री, प्रधान सचिव (कृषी) या सर्वांना नुकतेच निवेदन देण्यात आले.

नागपुरातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची इमारत जीर्ण झालेली आहे. ती मागील 166 वर्ष जुनी इमारत आहे. इमारतीचे बांधकाम नवीन करायचे आहे. त्याकरिता राज्य शासनाकडून निधी मिळण्यात यावा. अशी मागणी केली आहे. परंतु 1856 मध्ये निर्माण झालेल्या या 166 वर्षात जुन्या व जीर्ण झालेल्या इमारतीतच अजूनही कृषी महाविद्यालय सुरू आहे. येथे बीएससी कृषी व एमएससी कृषि हे अभ्यासक्रम सुरू आहे. या इमारतीत कार्यालय प्रयोगशाळा वर्ग कक्ष तसेच इतर विभागही आहेत या महाविद्यालयात आज विद्यार्थ्यांची संख्या बाराशेच्यावर असून कर्मचारी, प्राध्यापक व इतर संस्था गृहीत धरल्यास हा आकडा जवळजवळ तीनशे पर्यंत आहे. राणी महाल या नावाने प्रख्यात ही इमारत हेरिटेज दर्जाची आहे. या इमारतीचे नूतनीकरण यथाशिग्र आवश्यक आहे.

पुणे येथे कृषी महाविद्यालयाची इमारततिचे नूतनीकरण यासाठी केंद्र सरकारने शंभर कोटीचे अनुदान देवून पुन्हा पुननिर्माण केले. परंतु नागपूर कृषी महाविद्यालय इमारतींच्या अनुदाना बाबत अजूनही निर्णय घेतलेला नाही. कृषी महाविद्यालय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले, मुली शिक्षण घेत असतात. तसेच हजारो कृषी स्थातकोत्तर व पीएचडी विद्यार्थी 116 वर्षात तयार झाले आहेत. या इमारतीची अधिक दुरावस्था झाली असून इमारतीचे छत, टॉवर, फरशांचे छत, मनोरा, लोखंडी बार, कवेलू, प्लास्टर त्याचप्रमाणे भिंतीला पडलेल्या भेगा व सज्जे अधिक धोकादायक आहेत. कधीही धोका होऊ शकतो राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावे. अशी मागणी केली आहे.

इमारतीच्या नूतनीकरणासाठी आवश्यक अनुदान मंजूर करण्यात यावा. जेणेकरून पुढील अघटित घटना टाळता येऊ शकेल जनहिताच्या दृष्टीने सकारात्मक विचार व्हावा व शासनास याबाबत शिफारस व्हावी. अशी विनंती या संघटनेने केली आहे.

Share on Social media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
Share on email
Email

Related Post

thumbnail-wordpress-thefreemedia

महाराष्ट्र: केमिस्टच्या हत्येचा आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले, एनआयएने सुरू केला तपास

नागपूर: महाराष्ट्रातील अमरावती येथे 21 जून रोजी गळा चिरून केमिस्टच्या हत्येप्रकरणी एनआयएने तपास सुरू केला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

Read More »
uddhav-thackeray-thefreemedia

उस्मानाबादच्या नामकरणावरून राष्ट्रवादीच्या ४० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

उस्मानाबाद: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायच्या आधी शहरांचे नामांतर केले. औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव नगर असे केले. औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी

Read More »

नागपुरात पहिल्यांदयाच LGBTQ+ प्राईड महिना (Pride Month) The Free Media आणि Click2Media कडून साजरा करण्यात आला

नागपूर: जून महिना हा LGBTQ प्राईड महिना (Pride Month) म्हणून ओळखला जातो. ह्याच महिन्याचा अजून आनंद वाढवायला द फ्री मीडिया (The Free Media) आणि Click2Media

Read More »

Latest News