1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

महिला पोलिस कर्मचा-यासांठी आनंदवार्ता..!! आता 12 ऐवजी 8 तासाची ड्युटी

MahaPoc
Spread the love

अमरावतीमध्ये शहर पोलिस दलामधील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी आता महिला कर्मचार्‍यांची ड्युटी 12 तासांऐवजी 8 तास केली आहे. उद्या (24 सप्टेंबर) पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. अमरावती शहर पोलिस आयुक्तालया मध्ये 275 महिला पोलिस अंमलदारांना आरती सिंग यांच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

अमरावती पूर्वी नागपूर शहरामध्ये महिला पोलिसांना आठ तास ड्युटी देण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला होता. त्यानंतर पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी पोलिस घटकांनी याचा विचार करावा अशा सूचना दिल्या. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी देखील असाच निर्णय घेत महिलांच्या ड्युटीमध्ये चार तासांची कपात करत 8 तास ड्युटी केली. त्यामुळे आता नागपूर, पुणे पाठोपाठ अमरावती या तिसर्‍या शहरात महिला अंमलदारांना 8 तास ड्युटीचा दिलासा मिळाला आहे.

महिला पोलिसांना ड्युटी बरोबरच कौटुंबीक जबाबदारी पार पाडावी लागते. अनेक वेळा सण-उत्सव बंदोबस्त गंभीर गुन्हे यानिमित्ताने त्यांना 12 तासापेक्षा अधिक वेळ करावंच लागतं. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे समोर आल्याने त्यांच्या ड्युटीमधून 4 तासांचा वेळ कमी करण्यात आला आहे. महिलांना चार तासांची सवलत मिळाल्याने आता अनेकींनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील आरती सिंग यांच्या निर्णयाचं स्वागत केले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    दक्षिण काश्मिरात सुरक्षा दल, दहशतवाद्यांमध्ये चकमक

    January 13th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveअतिरेक्याला कंठस्नान, पोलिस शहीद श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) : दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील परिवान...

    वाघावर स्वार होणे सोपे असते,पण…. :राजू शेट्टी

    November 26th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveराज्य सरकारने एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याची घोषणा केली. मात्र कर्मचारी विलीन...

    युक्रेनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना का घातले साकडे?

    March 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveरशिया युक्रेन युद्धाचा आजचा ११ वा दिवस आहे. अजूनही रशियन लष्करची युक्रेनवर कारवाई सुरूच आहे. त्यामुळे युक्र...