नागपूर: एखाद्या ठिकाणी आपल्याला स्वत:च्या गाडीने जायचं म्हटलं की, इंधनाचा खर्च, खाण्या-पिण्याचा खर्च आणि टोल असा एकूण खर्च येतो. तसेच टोल देखील आपल्याला भरावा लागतो. विविध प्रकारच्या वाहनांसाठी वेगवेगळा टोल असतो. पण Google Maps च्या या नवीन फिचरमुळे तुम्हाला टोल खर्चाचा लगेच अंदाज येईल.
Google ने भारत, अमेरिका, जपान आणि इंडोनेशियामधील वापरकर्त्यांसाठी मॅपमध्ये (Google Maps) एक नवीन फीचर आणले आहे जे दिलेल्या मार्गावरील टोल शुल्काचा आगाऊ अंदाज देईल.
कंपनीच्या मते, हे फीचर अमेरिका, भारत, जपान आणि इंडोनेशियामधील अंदाजे 2000 टोल रस्त्यांसाठी त्याच्या iOS आणि Android अप्ससाठी उपलब्ध आहे आणि लवकरच आणखी देशांमध्ये जोडण्याची योजना आहे.
For the planner friend: this new feature is for you. 🙏
— Google Maps (@googlemaps) June 13, 2022
Now when you’re planning trips big and small, you can check estimated toll prices before you pick a route—and spend what you save on road snacks. pic.twitter.com/Lfy8s2TXQU
Google ने एप्रिलमध्ये भारत, अमेरिका, जपान आणि इंडोनेशियामधील मॅपवर टोलच्या किमती रोल आऊट करण्याची घोषणा केली, ज्यामुळे वापरकर्त्यांना टोल रस्ते आणि नियमित रस्ते यापैकी एक निवडण्यात मदत होईल. या नवीन अपडेटसह, वापरकर्ते आता प्रवास सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या गंतव्यस्थानासाठी टोलची अंदाजे किंमत शोधू शकतात.
येत्या काळात EMI आणखी वाढणार; फिच रेटिंग्सचा अंदाज, डिसेंबरपर्यंत RBI चे व्याजदर 5.9 टक्क्यापर्यंत पोहोचणार? Google चे फीचरबद्दल काय म्हणणे आहे? Google ने सांगितले की, अँपवर दाखवली जाणारी टोलची किंमत स्थानिक टोलिंग प्राधिकरणांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीवर आधारित आहे.
शेअर बाजारात सुरु असलेल्या पडझडीत गुंतवणूकदारांनी काय करावं? ऐका तज्ज्ञांचा सल्ला गुगल मॅप्सवर टोल फ्री मार्गांचीही माहिती दिली जाईल पर्यायी मार्गांच्या शोधात असलेल्यांसाठी, Google मॅप्स टोलमुक्त मार्गाचा पर्याय उपलब्ध असेल तेथे टोल आणि टोल फ्री मार्गाचा पर्याय देत राहील.
ज्यांना टोल मार्ग पूर्णपणे टाळायचे असतील तर, Google मॅपमधील डारेक्शनवरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सवर एक ऑप्शन वापरकर्त्यांना निवडावा लागेल आणि त्यानंतर ‘टोल फ्री’ रस्त्यांची माहिती त्यांना मिळेल.