1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

ठाण्यात नाही तर; दादरमध्ये फोडू दहीहंडी: मनसेचा इशारा

dahihandi
Spread the love

कोरोना महामारीने मागील वर्षीपासून जगभरात थैमान घातले आहे. बऱ्याच देशांमधील कोरोना हा पूर्णपणे आटोक्यात येत असला तरी भारतात मात्र अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यामुळे आता निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकार व प्रशासन हे गंभीरतेने विचार करूनच निर्णय घेत आहेत.

यंदा देखील कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्व धर्मियांनी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे असे आवाहन केले जात आहे. राज्य सरकार आणि दहीहंडी समन्वय समितीमध्ये झालेल्या बैठकीनंतर दहीहंडीला परवानगी नाकारण्यात आली आहे. उद्याच दहीहंडी असून मनसे आणि भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये दहीहंडी होणारच असा निर्धार केला आहे.

आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडी सरकारसह शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. ‘जर ठाण्यात दहीहंडी साजरी करू दिली नाही तर दादर मध्ये दहीहंडी फोडू,’ असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं आहे. दरम्यान, ‘आंदोलनावेळी आणि जन आशीर्वाद यात्रेवेळी कोरोना नसतो का? हिंदू आणि मराठी सणांनाच बंदी का? कोरोनाची तिसरी लाट येणार याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? तुम्हाला वाटलं की तिसरी लाट येणार आहे का ?’ अशा प्रश्नांची सरबत्ती करत संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला होता.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कोराडी, खापरखेडा प्रकल्पाचा धोका, हवा-पाणी-माती प्रद...

    November 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर येथील कोराडी आणि खापरखेडा थर्मल पॉवरमुळे पर्यावरणाचं नुकसान होत आहे. या ...

    “किरीट सोमैया अमरावतीला येऊन काय करणार…....

    November 17th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveत्रिपुरातील घटनेमुळे महाराष्ट्रातही हिंसाचाराचे दृश्य पहिला मिळाले. अमरावती गेल्या काही दिवसांपासून हिंसाचा...

    अटकपूर्व जामीन मंजूर; गजानन काळेंना न्यायालयाचा दिलासा

    September 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नेरुळ पोलीस ठाण्यात गजान...