The Free Media

nana-patole-thefreemedia

बीड : राष्ट्रवादीने खंजीर खुपसला असे तुम्ही सांगत आहात. खंजीर खुपसल्यामुळे तुम्ही रक्तबंबाळ झालात, तरीही तुम्ही तिथेच! म्हणजे, सत्तेसाठी सोबत आहात. जर तुमच्या मध्ये हिम्मत असेल तर आघाडी सरकारचा पाठींबा काढून दाखवा, असे आव्हान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय असे म्‍हटले होते. यावर बीड यथे पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असतांना आठवले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीत चार राज्यात आमचे सरकार आले आहे. त्यामुळे आम्हाला चिंता नाही.

मोदींचा सामना करणे हे कुणाचही काम नाही. ‘सबका साथ सबका विकास’ ही भूमिका घेऊन मोदीजी काम करत आहेत. त्यामुळे २०२४ ची लोकसभा निवडणूक आम्हीच जिंकणार, यात शंका नाही. मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल बोलणाऱ्यांना मोदीजींनी भाजपमधून काढून टाकले आहे. असेही आठवले म्हणाले.

Share on Social media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
Share on email
Email

Related Post

uddhavthackery-cm-thefreemedia

विधानसभेत बहुमत सिद्ध करा; राज्यपालांचा आदेश

नागपूर: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक मोठी बातमी आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकारनं बहुमत गमावलं

Read More »
chip technology-thefreemedia

आर्मने (Arm )स्मार्टफोन गेम्ससाठी नवीन चिप तंत्रज्ञान लाँच केले

नागपूर: सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पच्या मालकीची ब्रिटीश चिप टेक्नॉलॉजी फर्म आर्म लिमिटेडने (Arm Ltd) मंगळवारी नवीन चिप तंत्रज्ञानाच्या संचाचे अनावरण केले ज्याचा उद्देश असे आहे की,

Read More »
thumbnail-thefreemedia

‘आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाहीत’; गुलाबराव पाटील

खासदार संजय राऊतांना गुलाबरावांचे प्रत्युत्तर गुवाहाटी: शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. गुलाबराव पाटलांना पुन्हा टपरीवर नाही

Read More »

Latest News