1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पाटणमध्ये १७ पैकी १५ जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात

Spread the love

सातारा जिल्ह्यातील पाटण नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचे वर्चस्व पुन्हा एकदा निर्विवाद प्रस्थापित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पाटणकर गटाने १७ पैकी तब्बल १५ जागांवर यश मिळवले आहे. तर सेनेचे राज्याचे गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई गटाला अवघ्या दोन जागांवर यश मिळालेले आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेल्या ना. शंभूराज देसाई यांना येथे जबरदस्त धक्का देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांची जिल्हा बँकेनंतरची विजयाची अखंडित परंपरा यापुढेही कायम राहील, असा सर्व स्तरातून विश्वास व्यक्त केला जात आहे. भाजपा, काँग्रेस आणि अपक्ष बंडखोरांचाही येथे पराभव झाला.

पाटण येथील बाळासाहेब देसाई कॉलेजवर सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत राष्ट्रवादी पुरस्कृत पाटणकर गटाच्या उमेदवारांच्या विजयाचे निकाल जाहीर होत होते. यात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पाटणकर गटाचे स्वप्निल माने (प्रभाग १), सौ. सुषमा गणेश मोरे (प्रभाग २), जगदीश शेंडे (प्रभाग ३), राजेंद्र राऊत (प्रभाग ४), सौ. संजना जवारी (प्रभाग ५), सागर पोतदार (प्रभाग ६), सौ. सोनम फुटाणे (प्रभाग ७), सौ. संज्योती जगताप (प्रभाग ८), संतोष चंद्रकांत पवार (प्रभाग ९), किशोर गायकवाड (प्रभाग १०), माजी उपनगराध्यक्ष सचिन कुंभार (प्रभाग ११), सौ.अनिता देवकांत (प्रभाग १२), सौ. मिनाज मोकाशी (प्रभाग १३), सौ. मंगल शंकर कांबळे (प्रभाग १६), उमेश टोळे (प्रभाग १७) हे पाटणकर गटाचे १५ उमेदवार निवडून आले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मंदिरापासून तंत्रज्ञानापर्यंत: सरकारने नवीन ‘बौद्धिक...

    July 15th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: राम मंदिर आणि सोमनाथ मंदिरासारख्या “ऐतिहासिक स्थळांच्या” जीर्णोद्धारापासून आणि जालियनवाला बाग स्मार...

    कोरोना लस घेण्यासाठी कोणावरही बळजबरी करता येणार नाही...

    May 3rd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनवी दिल्ली- देशातील कोरोना लसीकरणावर सर्वोच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. कोरोनाची लस घेण्यासाठी कोण...

    मोदी पंतप्रधान झाल्यापासून महिलांची सैन्यातील भूमिका...

    November 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love‘नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाल्यापासून भारतीय सैन्यातील महिलांची भूमिका वाढली आहे’ असे प्रतिपादन भा...