1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

बाबासाहेबांनीच केली होती पहिल्यांदा ‘जय भवानी’ ही घोषणा; प्रकाश आंबेडकर

Spread the love

ठेकेदारांनो जरा वाचायला शिका म्हणत ‘जय भवानी’ घोषणेबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जय भवानी ही घोषणा दिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकरांनी याला दुजोरा देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या अधिकृत लेटर हेडवर भवानीचे चित्र असल्याचेही नमूद केले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, काही ऐतिहासिक तथ्यांचा उलगडा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने होणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ व शिवाजी महाराज हे नाते जुने आहे. जय भवानी ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. परळच्या दामोदर हॉल येथे बाबासाहेबांना भेटायला येणारे लोक हे एकमेकांना ‘जय भवानी’ असे अभिवादन करत असत. त्याकाळी बाबासाहेबांच्या अधिकृत लेटर हेडवर भवानीचे चित्र असे.

महाड सत्याग्रहाच्या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराज, महात्मा फुले व गांधीजींच्या प्रतिमा ठेवल्या होत्या. महाड सत्याग्रहाच्या वेळी दासगाव ते महाडपर्यंत निघालेल्या जमावाने “शिवाजी महाराज”, “राजमाता जिजाऊ” यांचा जयजयकार करायला सुरुवात केली होती. ठेकेदारांनो जरा वाचायला शिका, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    प्रजासत्ताक दिनी पत्रकार भवनात ध्वजारोहण

    January 29th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: टिळक पत्रकार भवन आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. नागपूर...

    नागपुरात नागरिकांना आजपासून लसीचे दोन डोज अनिवार्य

    November 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवे आदेश...

    नागपूर मेडिकल इस्पितळात नेजल स्प्रेची चाचणी; डॉ. प्र...

    October 2nd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकोरोना संकट लवकर संपविण्यासाठी देशातील आरोग्य विभाग सतत प्रयत्न करत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी...