The Free Media

Rinda-thefreemedia

गुप्तचर विभागाने केला मोठा खुलासा

भारताचा मोस्ट वाँटेड खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाबाबत गुप्तचर विभागाचा मोठा खुलासा केला आहे. रिंदा त्याची ओळख लपवण्यासाठी नेहमी वेशांतर करत असतो. एवढेच नव्हे तर, त्याने आतापर्यंत 6 वेळा वेगवेगळ्या प्रकारे वेशांतर केले आहे, अशी माहिती एजन्सीच्या तपासात समोर आले आहे. रिंदासाठी भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी 27 स्लिपर सेल काम करतात, असा देखील खुलासा करण्यात आला आहे.

रिंदा याने 2020 मध्ये पाकिस्तानी एजन्सी ISI च्या मदतीने भारतातून पळ काढला होता. तेव्हापासून तो स्लीपर सेलच्या मदतीने पंजाब, हरियाणा, हैदराबाद आणि महाराष्ट्रात स्फोटकांचा पुरवठा करत असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, एजन्सींनी त्याला A+ स्तरावरील गुंड म्हणून घोषित केले आहे.

हरविंदर सिंग रिंदा याच्यावर आतापर्यंत 37 गुन्हे दाखल असून, त्यापैकी नांदेडमध्ये 14 आणि पंजाबमध्ये 23 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आतापर्यंत त्याच्या 15 साथीदारांना अटक केली आहे. रिंदावर मोक्का, अपहरण आणि खूनाचे गुन्ह्यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सर्वात धक्कादायकबाब म्हणजे रिंदाने त्याच्या खटल्याशी संबंधित महत्त्वाच्या साक्षीदारांचीही हत्या केली आहे.

रिंदासाठी भारतात करतात 27 गुंड काम

गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या तापसामध्ये खलिस्तानी दहशतवादी रिंदासाठी भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी 27 गुंड काम करतात, अशीदेखील माहिती आतापर्यंतच्या तपासात समोर आली आहे. त्यापैकी एकाचे नाव गुरप्रीत असून त्याला नुकतेच पंजाबमधील करनाल येथील कारवाईदरम्यान अटक करण्यात आली आहे.

Share on Social media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
Share on email
Email

Related Post

thumbnail-wordpress-thefreemedia

महाराष्ट्र: केमिस्टच्या हत्येचा आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले, एनआयएने सुरू केला तपास

नागपूर: महाराष्ट्रातील अमरावती येथे 21 जून रोजी गळा चिरून केमिस्टच्या हत्येप्रकरणी एनआयएने तपास सुरू केला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

Read More »
uddhav-thackeray-thefreemedia

उस्मानाबादच्या नामकरणावरून राष्ट्रवादीच्या ४० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

उस्मानाबाद: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायच्या आधी शहरांचे नामांतर केले. औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव नगर असे केले. औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी

Read More »

नागपुरात पहिल्यांदयाच LGBTQ+ प्राईड महिना (Pride Month) The Free Media आणि Click2Media कडून साजरा करण्यात आला

नागपूर: जून महिना हा LGBTQ प्राईड महिना (Pride Month) म्हणून ओळखला जातो. ह्याच महिन्याचा अजून आनंद वाढवायला द फ्री मीडिया (The Free Media) आणि Click2Media

Read More »

Latest News