1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘जैवतंत्रज्ञान स्टार्टअप प्रदर्शन- 2022’चे मोदींच्या हस्ते उद्घाटन

PM-modi-thefreemedia
Spread the love

नवी दिल्‍ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 9 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता नवी दिल्लीत प्रगती मैदान येथे ‘जैवतंत्रज्ञान स्टार्टअप प्रदर्शन- 2022’चे उद्घाटन करणार आहेत. उद्घाटनानंतर पंतप्रधान या कार्यक्रमात उपस्थितांना उद्देशून भाषणही करणार आहेत.

जैवतंत्रज्ञान स्टार्टअप प्रदर्शन – 2022 हा दोन दिवसीय कार्यक्रम असून 9 व 10 जून रोजी त्याचे आयोजन करण्यात आले आहे. जैवतंत्रज्ञान विभाग आणि BIRAC म्हणजेच जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्यक परिषद यांच्यामार्फत हे प्रदर्शन भरवले जाणार आहे. BIRAC च्या स्थापनेला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हे प्रदर्शन आयोजित केले जात आहे. ‘जैवतंत्रज्ञान स्टार्टअप नवोन्मेष-: आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल’ अशी या प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

उद्योजक, गुंतवणूकदार, उद्योगजगतातील धुरीण, वैज्ञानिक, संशोधक, जैविक क्षेत्रातील उद्योगांचे जनक, कारखानदार, नियामक, सरकारी अधिकारी आदी घटकांना परस्परांशी जोडण्यासाठी हा मंच उपयुक्त ठरणार आहे. या प्रदर्शनात सुमारे 300 स्टॉल्स असतील. आरोग्यसेवा, जिनॉमिक्स, जैव-औषधशास्त्र, कृषी, औद्योगिक जैवतंत्रज्ञान, कचऱ्यापासून मौल्यवान वस्तूंची निर्मिती, स्वच्छ ऊर्जा अशा विविध क्षेत्रांमध्ये जैवतंत्रज्ञानाचे उपयोजन कसे होऊ शकते, ते या स्टॉल्समधून प्रदर्शित केले जाणार आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    माजी मुख्यमंत्री म्हणाले,’मला मंत्री नाही फक्त...

    January 24th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveगोव्यात पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण पेटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील (BJP...

    भारताची अभूतपूर्व कामगिरी; प्रथमच थॉमस कपवर उमटवली म...

    May 16th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveइंडोनेशिया: भारताने ऐतिहासिक व अभूतपूर्व कामगिरी करत थॉमस कपच्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव ...

    आज गोव्यात मतदान; मतदारांचा पसंती कुणाला?

    February 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्राच्या शेजारील राज्य असलेल्या गोव्यात आज मतदान पार पडत आहे. गोव्यातील ४० जागांसाठी गोवेकर आज आपला ...