1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपूर जि.प. पोटनिवडणूक; महाविकास आघाडी तुटल्यात जमा

nana patole2
Spread the love

नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तुटल्यात जमा आहे. शिवसेना सर्व जागांवर उमेदवार देणार आहे. शिवसेनेच्या बैठकीत खासदार कृपाल तुमाने यांनी भूमिका स्पष्ट केली. नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समितीच्या 31 जागांवर शिवसेना पोटनिवडणूक लढवणार आहे. जिल्हा परिषदेच्या 12 सर्कलमध्ये शिवसेनेनं उमेदवार उभे केले आहेत.

आघाडी करण्याबाबतच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर न दिल्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला होता. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढण्याची घोषणा स्थानिक पातळीवर केली आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी तिरंगी लढत नागपुरात पाहायला मिळेल.

शिवसेनेच्या प्रस्तावाला उत्तर नाही

नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडी पॅटर्न राबवण्याचा प्रस्ताव स्थानिक शिवसेनेने राष्ट्रवादीला दिला होता. मात्र राष्ट्रवादीने शिवसेनेच्या प्रस्तावाला कोणतंही उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली. नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 61 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.

Claim Free Bets

“म्हणून शिवसेना स्वबळावर लढणार”

शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी जून महिन्यातच दिली होती. “कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून सेना स्वबळावर पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे” असं आशिष जैसवाल यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असं चित्र पाहायला मिळणार आहे.

नागपुरातच पटोलेंच्या घोषणेला बगल

दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेनंतरही नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीने हातात हात धरला आहे. नागपूर जिल्हा परिषदेत दोन्ही पक्ष एकत्र पोटनिवडणूक लढवण्याबाबत शिक्कामोर्तब झालं. दोन्ही पक्षात जागावाटपासाठी सार्वत्रिक निवडणुकीचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राज्यात नवा हाय व्होल्टेज ड्रामा; ठाकरे सरकारमधील ४ ...

    June 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: काल दि २० जून रोजी विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागले. भाजपने राज्यसभा निवडणुकीच्या निकालाची पुनराव...

    आश्चर्यम…!! फरार परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा ग...

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबईचे माजी पोलीस आयुक्त मागील अनेक दिवसांपासून फरार आहेत. त्यांचा अटक वारंट महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तच...

    राज्यातील शिक्षक कर्मचा-यांनी लसीचे डोस पूर्ण करा; अ...

    September 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असताना दुसऱ्या बाजूला लसीकरण मोहीम देखील जोरात राबविण्यात येत आहे....