1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

ओबीसी आरक्षण विदर्भातील ३८ नगरपंचायतीच्या १०५ जागांना फटका

supremecourt-thefreemedia
Spread the love

ओबीसी आरक्षणाच्या जागांवर स्थगिती

विदर्भात २१ डिसेंबरला ३८ नगरपंचायती तसेच गोंदिया व भंडारा जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. ओबीसी आरक्षणाचा राज्य शासनाचा अध्यादेश सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलाय. याचा फटका विदर्भातील ३८ नगरपंचायतीच्या १०५ जागांना बसला. त्यात सर्वाधिक चंद्रपूरमध्ये २०, तर यवतमाळ जिल्ह्यातील १८ जागांचा समावेश आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ६८ जागांची निवडणूक स्थगित झाली आहे.

विदर्भातील ३८ नगरपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं घोषीत केला. त्यानुसार, सात डिसेंबरला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोमवारची शेवटची तारीख होती. पण, सहा डिसेंबरला सर्वोच्च न्यायालायानं अध्यादेशाला स्थगिती दिल्यानं ओबीसी उमेदवार नाराज झाले.

अमरावती जिल्ह्यातील भातकुली, तिवसा, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, लाखांदूर व लाखनी, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही, सावली, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, कोरपना, जिवती, गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, एटाप्लली, भामरागड, अहेरी, सिरोंचा, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, देवरी, नागपूर जिल्ह्यातील हिंगणा, कुही, वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर, सेलू, कारंजा (घाडगे), आष्टी, यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, राळेगाव, बाभूळगाव, महागाव, मोरगाव, झरी जामणी, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, मोताळा तसेच वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथे २१ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. तेथील ओबीसी जागांवरील निवडणूक आता स्थगीत करण्यात आली आहे. उर्वरित जागांवरील निवडणूक घोषीत कार्यक्रमाप्रमाणे होईल.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘हिंदूंचा अपमान करणा-या वेबसिरीजवर बंदी घालावी...

    August 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबॉलिवूडमधील चित्रपट दिग्दर्शक कबीर खान याने मुघल सम्राज्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण ...

    उपराजधानीत झाले शिवबंधन सैल

    August 31st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी परवाच राष्ट्रवादी ...

    उस्मानाबादच्या नामकरणावरून राष्ट्रवादीच्या ४० पदाधिक...

    July 2nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveउस्मानाबाद: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायच्या आधी शहरांचे नामांतर केले. औरंगाबादचे संभाजी...