1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘माझ्याच घरातील लोकांना माझे गुण कळले नाही’; धनंजय मुंडेची टोलेबाजी

dhananjay munde
Spread the love

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बीड दौऱ्यादरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव आघाव यांच्यासह चार जणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी ‘माझ्याच घरातील लोकांना माझ्यातले गुण कळले नाहीत’ असे म्हणत टोलेबाजी केली आहे.

यावेळी बोलत असतांना धनंजय म्हणाले की,’मी काही जिल्ह्यामध्ये या परिवार संवाद यात्रेमध्ये जयंत पाटलांसोबत होतो. या परिवाराचे प्रमुख हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब आहेत. प्रत्येक मतदारसंघात आपला पक्ष आपला परिवार हे पाहण्यासाठी हा परिवार दौरा आहे. आमच्या पक्षातील नेते परळीत आल्यावर स्वागत असंच होणार. या अगोदर अनेक कार्यक्रम घेतले, तोच विश्वास तोच प्रेम तुम्ही माझ्यावर टाकता, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे’ असे ते म्हणाले.

पुढे बोलत असतांना ते म्हणाले की, ‘३३ पैकी ३० नगरसेवक राष्ट्रवादीचे परळीत निवडणून आणले. पंचायत समिती, सर्व स्थानिक संस्थांवर राष्ट्रवादीची पकड आहे. परळी मतदारसंघात आमची पकड मजबूत आहे. २०१४ च्या निवडणुकीत पडेल उमेदावराला पवार साहेबांनी राज्याचे विरोधीपक्ष नेते पद दिले, माझ्या घरातील लोकांना माझ्यातले गुण कळले नाहीत’ असे म्हणत त्यांनी टोलेबाजीही केली.

Claim Free Bets

दरम्यान, ‘ज्या पक्षांनी माझ्यावर विश्वास टाकला ती परळी आज राष्ट्रवादीचा बालेकिल्ला केला. माझ्यासमोर मोठी ताकद होती, वारसा होता. वैद्यनाथ कारखाना ताब्यात घेऊ शकतो मात्र आपल्याला तसं करायचं नाही. लढाई करूनच ताब्यात घेऊ. मला कोणी समुद्र मागितला तर तुमच्यासाठी मी नाही म्हणू शकत नाही’ असेही ते म्हणाले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा मिनी यूपीए प्रयोग : सं...

    December 7th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमहाराष्ट्रात महाविकास आघाडीचा हा मिनी यूपीएचा प्रयोग आहे, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त के...

    नवाब मलिकांविरोधात एफआयआर दाखल; क्रांती रेडकर यांची ...

    October 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआर्यन खान प्रकरणात वादात सापडलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे हे मुस...

    पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाई

    October 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआ.बच्चू कडू यांच्या प्रयत्नांना यश ज्या पीक विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांना २५ टक्के रक्कम आग...