भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला असून ग्रामीण भागात मतदार जागृतीसाठी 16 नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागामार्फत देण्यात येतील, असे प्रतिपादन प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत आयोजित पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मिलींद शंभरकर, उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, साताराचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पुण्याच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, सोलापूरच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, साताराच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे आदी उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसभेचे नियोजन करावे. नवमतदार आणि गावात नुकतेच विवाह होऊन आलेल्या महिलांची शिबिराच्या माध्यमातून मतदार यादीत नोंदणी करण्यात यावी. मतदार यादीत दिव्यांग मतदारांची नोंद घेण्यात यावी. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 13 व 14 नोव्हेंबर तसेच 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी सर्व मतदान केंद्र, मोठी महाविद्यालये, औद्यागिक क्षेत्रात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. त्यासाठी स्वयंसेवी
