1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘स्मृतिगंध’कार कवयित्री सुधा मेश्राम साहित्य सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित

event
Spread the love

अर्जुनी/मोरगाव : झाडीबोलीशी सदैव एकरूप असलेल्या तसेच मराठी भाषा सक्षमीकरणासाठी अहोरात्र झटत असलेल्या अर्जुनी/ मोर जि. गोंदिया येथील प्रसिद्ध कवयित्री सुधा अश्वस्थामा मेश्राम यांच्या पहिल्या ‘स्मृतिगंध’ कविता संग्रहाचे लोकार्पण ‘मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह नागपूर येथे नुकतेच उत्साहात संपन्न झाले. त्यांना यावर्षीचा मराठी साहित्य लेखनाचा ‘साहित्य सेवा सन्मान’ पुरस्कार पत्रकार रेणुका किन्हेकर ‘दि फ्री मिडीया’ नागपूर यांच्या हस्ते देण्यात आला.

सुधा मेश्राम या मागील ४ वर्षापासून शैक्षणिक, कविता व साहित्य क्षेत्रात मराठी भाषेच्या संवर्धनार्थ मराठीचे शिलेदार समूहासाठी मुख्य सहप्रशासक म्हणून अविरत कार्यरत आहेत. त्यांचे भाषेसाठीचे योगदान अतुलनीय असून, शैक्षणिक दर्जा अधिकाधिक वृद्धिंगत होण्यासाठी त्या नवनवीन उपक्रम समूहासाठी तयार करीत असतात. तसेच समूहाच्या सर्व साप्ताहिक काव्यस्पर्धेत त्या परीक्षक व संकलक म्हणून मोलाचे कार्य करत आहेत. गतसाली मराठीचे शिलेदार संस्थेने त्यांचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन यथोचित सन्मान केला आहे.

मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर आयोजित काव्यसंग्रह प्रकाशन समारंभात कवयित्री सुधा मेश्राम यांच्या ‘स्मृतिगंध’ कविता संग्रहासोबतच तब्बल १७ पुस्तकांचे प्रकाशन अध्यक्ष श्री.दादाकांत धनविजय,प्रमुख मार्गदर्शक श्री. डॉ.अनिल पावशेकर व प्रा.आनंद मांजरखेडे तसेच अतिथी मा.मयुर निमजे, डॉ सोहन चवरे, पत्रकार कु.रेणुका किन्हेकर या सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राज्यातील ३० कवी कवयित्रींना “साहित्य सेवा सन्मान पुरस्कार २०२१” देऊन सन्मानित करण्यात आले. समारभांचे सूत्र संचालन राहुल पाटील यांनी केले तर आभार प्राजक्ता खांडेकर यांनी मानले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    बंडखोर एकनाथ शिंदे राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेच...

    June 22nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveगुवाहाटी: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व बंडखोर एकनाथ शिंदे आज पहाटे सूरतहून ४० बंडखोर आमदारासह आसामच्या गुवाहाटी...

    फडणवीस-चंद्रकांत पाटलांची वरिष्ठांसोबत बैठक; पक्ष का...

    November 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घ...

    नारायण राणेंना जामीन मंजूर

    August 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा...