The Free Media

नागपूर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सरचिटणीस ॲड. नंदाताई पराते यांच्या नेतृत्वात आज दि ३१ मार्च रोजी दुपारी गोलीबार चौक परीसरात आंदोलन करण्यात आले. शेकडो कार्यकर्त्यांनी उग्र आंदोलन करून प्रचंड घोषणाबाजी केली.

मोदी सरकार मुर्दाबाद, बीजेपी तेरी महागाई नही चलेंगी, होश मे आयो, होश मे आयो , महागाई कम करो. महंगाई की मार महिलांओ पर वार, पेट्रोल डिझेल शंभरावर , मोदी बस्स करा जनतेची लूटमार,जीवनावश्यक वस्तू के दाम कम करो, जनता के हितमें कॅाग्रेस मैदानमें. या गगनभेदी नारे देत निर्दशने केलीत.

बीजेपीच्या मोदी सरकारने पेट्रोल , डिझेल व गॅस सिलेंडरची भाववाढ करून जनतेची कमर तोडली आणि देशात भाववाढीमुळे महागाईचा राक्षस जनतेच्या छातीवर आणून बसविले आहे. बीजेपी सरकार जनतेचे जगणे नामोहरण करीत आहे म्हणून पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ विरोधात महागाई मुक्त भारत करावे म्हणून कॅाग्रेस पक्ष जनतेचा हितासाठी आंदोलन करीत रस्त्यावर उतरल्याचे शहरात पाहावयास मिळाले.

बीजेपी सरकारच्या भाववाढ व महागाई विरोधात काँग्रेस नेत्या ॲड. नंदाताई पराते, माजी उपमहापौर अण्णा राऊत,रमन पैगवार, पिंटू बागडी,पुरुषोत्तम गौरकार,मंदा शेंडे, कल्पना अड्यालकर,शकुंतला वठ्ठीघरे, गिता हेडाऊ, माया धार्मिक,अभिषेक मोहाडीकर,अभिजीत ठाकरे,शुभम शेंडे,पवन चौधरी आकाश बावणे,कुंदा निनावे, ज्योती कवाडघरे,पुष्पा सदावर्ती, शिला पौनिकर, लक्ष्मी निखार सह शेकडों कॅाग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. काँग्रेसच्या या आंदोलनात लोकांचा उत्सफुर्तपणे सहयोग होता.

Share on Social media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
Share on email
Email

Related Post

Shiv Sena-sanjay-raut-thefreemedia

बंडखोर व गद्दारांसाठी शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद – खासदार विनायक राऊत

शिवसेनेतून जे आमदार गेले ते बंडखोर व गद्दारच आहेत. त्यांना यापुढे पक्षात कधीही घेतले जाणार नाही. त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. शिवसेनेचं नाव

Read More »
Chief Minister Shinde-thefreemedia

सावरकरांच्या होणा-या अपमानावर आम्हाला बोलता आले नाही; मुख्यमंत्री शिंदे

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या मुंबईत अनेक ठिकाणी भेटी देत आहेत. मंगळवारी त्यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर स्वातंत्र्यवीर

Read More »
stratup-thefreemedia

स्टार्टअप आणि युनिकॉर्न हे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे नवीन चालक

नवी दिल्‍ली: केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाने नवीन संधी उपलब्ध करून आणि देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे चालक म्हणून युवावर्गाला प्राधान्य देऊन देशाच्या आर्थिक परीदृश्यात विस्मयकारी परिवर्तन

Read More »

Latest News