The Free Media

ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त सेवा देणाऱ्या रिलायन्स जिओने आता लॅपटॉप तयार करण्याचं ठरवलं आहे. रिलायन्स जिओचा पहिला लॅपटॉप Jio Book लवकरच भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. जिओ फोन प्रमाणेच हा लॅपटॅापही स्वस्त दरात उपलब्ध होणार अशी चर्चा आहे. ARM प्रोसेसर आणि Windows 10 सह Jio Book ला लॉन्च करण्यात येईल. जिओ बुकचे हार्डवेअर सर्टिफिकेशन डॉक्युमेंट लीक झालं असून, लॅपटॉपच्या फीचर्सची माहिती देण्यात आली​ आहे.

लॅपटॉपचे हार्डवेअर चीनी कंपनी बनवत असल्याची माहिती समोर आली आहे. जिओच्या वतीने एकदा सांगिण्यात आले होते की ते त्यांच्या कोणत्याही उत्पादनांसाठी किंवा सेवांसाठी चीनची मदत घेणार नाही. मात्र, नुकत्याच लाँच झालेल्या जिओ फोन नेक्स्टच्या बॅटरीवर मेड इन चायनाही लिहिलेले आहे.

रिपोर्टनुसार, Jio Book चे उत्पादन नाव QL218_V2.2_JIO_11.6_20220113_v2 आहे. इंटेल किंवा AMD x86 CPU लॅपटॉपमध्ये आढळू शकतात. याआधीही जिओ बुकचे अनेक रिपोर्ट्स समोर आले आहेत.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये देखील Jio Book बद्दल एक रिपोर्ट आला होता, ज्यानुसार Jio च्या लॅपटॉप JioBook ची किंमत 9,999 रुपये असेल, जरी ही सुरुवातीची किंमत असेल. जिओ बुक इतर अनेक प्रकारांमध्ये देखील लॉन्च केले जाईल. याशिवाय JioBook मध्ये 4G कनेक्टिव्हिटी देखील मिळेल. Jio च्या लॅपटॉप JioBook मध्ये फोर्क्ड एंड्रॉयड असणार द्याला JioOS म्हणून ओळखले जाईल. जिओचे सर्व अॅप्स लॅपटॉपमध्ये असणार. लॅपटॉप बनवण्यासाठी रिलायन्सने JioBook साठी चीनी कंपनी ब्लूबँक कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीसोबत भागीदारी केल्याचं बोलले जात आहे. हीच कंपनी JioBook लॅपटॉप बनवत आहे. याच कंपनीने Jio फोन देखील बनवला आहे.

Share on Social media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
Share on email
Email

Related Post

thumbnail-wordpress-thefreemedia

महाराष्ट्र: केमिस्टच्या हत्येचा आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले, एनआयएने सुरू केला तपास

नागपूर: महाराष्ट्रातील अमरावती येथे 21 जून रोजी गळा चिरून केमिस्टच्या हत्येप्रकरणी एनआयएने तपास सुरू केला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

Read More »
uddhav-thackeray-thefreemedia

उस्मानाबादच्या नामकरणावरून राष्ट्रवादीच्या ४० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

उस्मानाबाद: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायच्या आधी शहरांचे नामांतर केले. औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव नगर असे केले. औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी

Read More »

नागपुरात पहिल्यांदयाच LGBTQ+ प्राईड महिना (Pride Month) The Free Media आणि Click2Media कडून साजरा करण्यात आला

नागपूर: जून महिना हा LGBTQ प्राईड महिना (Pride Month) म्हणून ओळखला जातो. ह्याच महिन्याचा अजून आनंद वाढवायला द फ्री मीडिया (The Free Media) आणि Click2Media

Read More »

Latest News