1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपूरच्या संजनाची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय संघात निवड

Sanjan-thefreemedia
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून संजनाची स्तुती

नागपूर : इंग्लंडमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेली उपराजधानीतील युवा ट्रायथलॉन खेळाडू संजना सुशील जोशी हिची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्तुती केली आहे.

इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी मोदींनी बुधवारी भारतीय खेळाडूंना ‘मोटिव्हेट’ केले. यावेळी खेळाडूंना उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी संघात समावेश असलेल्या १६ वर्षीय संजनासह अन्य युवा खेळाडूंचा विशेषत्वाने उल्लेख केला. ते म्हणाले, राष्ट्रकुल स्पर्धेसाठी जात असलेला भारतीय संघ खास असून, अनुभव आणि ऊर्जा यांचा अद्भुत संगम आहे. हे १७-१८ वर्षांचे खेळाडू देशाचे भविष्य असल्याचे सांगून, ते नक्कीच स्पर्धेत भारताचे नाव रोशन करतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तुम्ही सर्व खेळाडू केवळ खेळातच नव्हे, तर जागतिक व्यासपीठावर ‘न्यू इंडिया’चे प्रतिनिधित्व करणार असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रकुल स्पर्धा २८ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान बरमिंघम येथे खेळली जाणार आहे. या स्पर्धेत संजना स्प्रिंट डिस्टन्स ट्रायथलॉनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत निवड झालेली ती नागपूरची पहिली महिला व माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रदीप गंधेनंतर दुसरी खेळाडू ठरली आहे. तीन क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या ट्रायथलॉनमध्ये खेळाडूला ७५० मीटर स्विमिंग, त्यानंतर २० किमी सायकलिंग आणि ५ किमी रनिंग करावे लागणार आहे. सोमलवार निकालसची विद्यार्थिनी असलेली संजना माइल्स एन मायलर्स एंडयुरन्स स्पोर्ट्स अकादमीचे प्रशिक्षक डॉ. अमित समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अफगाणिस्थानच्या मुद्द्यावर ७ देशांच्या राष्ट्रीय सुर...

    November 10th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveप्रकाश आंबेडकर यांचा दावा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटी वसुली प्रकरणात फसवल्याचं दिसत ...

    केंद्रसरकार तामिळनाडूसोबत हिंदी भाषेचा वापर करू शकत ...

    September 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने केंद्र सरकार तामिळनाडूसोबत कार्यालयीन व्यवहार करताना हिंदी भाषेच...

    व्हॉट्सॲप भारतीय न्यायव्यवस्थेमधील कायद्याला विरोध क...

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveव्हॉट्सॲपची मालकी असलेल्या फेसबूकने केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात ध...