1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“संजय पांडेंच्या कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील लोकांचे फोन टॅप केले”

phone-tap-thefreemedia
Spread the love

मुंबई: भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय पांडे यांना काल ईडीने अटक केली आहे.संजय पांडेंच्या कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील लोकांचे फोन टॅप केले, असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही लक्ष्य केलं. तसेच दोघांचीही प्रकरणं शेवटपर्यंत जातील, असं नमूद केलं. ते मंगळवारी (१९ जुलै) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

किरीट सोमय्या म्हणाले, “जैसी करणी वैसी भरणी. इथल्या इथंच चुकवावं लागतं. संजय राऊत, संजय पांडे यांनी पापं केली. दहशतवाद, वसुली, माफियागिरी केली. आता ६ ऑगस्टला संजय राऊतांना शिवडी न्यायालयात उपस्थित रहावं लागणार आहे. संजय पांडेंची काल सीबीआयने चौकशी केली, आज ईडी चौकशी आहे. संजय राऊत व संजय पांडे दोघांची प्रकरणं शेवटापर्यंत जाणार आहेत.”

“संजय पांडे यांच्या कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील लोकांचे फोन टॅप करत होती. यासाठी त्यांच्या कंपनीला ४ कोटी ४४ लाख रुपये मिळाले. म्हणजे आयपीएस अधिकारीच बेकायदेशीर काम करतो. त्याला ठाकरे सरकार मुंबई पोलीस आयुक्त बनवते. त्या ठाकरे सरकारकडून महाराष्ट्राची सुटका झाली. ते महाविकास नव्हे तर महावसुली सरकार होते,” असा आरोप किरीट सोमय्यांनी केला.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारताच्या जनतेचे आहेत. महाराष्ट्राचा विकास हेच त्यांचं लक्ष्य आहे. त्यासाठी दोघांनी वाहून घेतलं आहे,” असंही सोमय्यांनी नमूद केलं. एकनाथ शिंदे शिवसेना आणि पंतप्रधान मोदींचा भाजपा आता एकत्र येऊन महाराष्ट्राचा विकास करणार आहे, असंही ते म्हणाले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    डॉ.आंबेडकर ACS चॅप्टरने राष्ट्रीय रसायनशास्त्र सप्ता...

    December 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveनॅशनल केमिस्ट्री वीक (NCW) ही एक जनजागृती मोहीम असून जी दैनंदिन जीवनात रसायनशास्त्राचे मूल्य वाढवते. ACS सद...

    कॅनडाच्या राजकारणात पंजाबीचा बोलबाला

    May 14th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveप्रांतीय निवडणुकांमध्ये तब्बल 20 पंजाबी उमेदवार रिंगणात कॅनडाच्या प्रांतिक निवडणुकांमध्ये पंजाबी लोकांची भू...

    भोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयात मुलांचा वॉर्डला लाग...

    November 9th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveभोपाळमधील कमला नेहरू रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये सोमवारी रात्री ९ च्या सुमारास भीषण आग लागली. या घटने...