The Free Media

WhatsApp Image 2022-02-24 at 9.50.40 AM (1)

हिंगणा: वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या १४६ व्या जयंती निमित्ताने ग्रामपंचायत वागधरा (गुम.)च्या वतीने प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वागधरा (गुम.) चे सरपंच प्रेमनाथ पाटील, अतिथी उपसरपंच किशोर वडवे, शिक्षक नंदकिशोर सोमकुंवर, यशवंत हायस्कूल वागधरा, शिक्षिका कल्पना गोरते जि. प.उ.प्रा.शाळा वागधरा, तलाठी रंजन तिवारी वागधरा (गुम.) साझा, शिक्षक माहुर्ले मधुबन शाळा वागधरा, गायक उद्धवजी बडगे हिंगणा, प्रमुख उपस्थिती म्हणून समुदाय आरोग्य अधिकारी अभिरुचि ढोले, आरोग्य सेविका ज्योती ढगे, आंगनवाडी सेविका मनीषा घोडे, सेवानिवृत्त शिक्षक रमेशराव लोणारे, कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे चे हिंगणा तालुका समतादूत सतीश सोमकुंवर यांनी स्थान भूषविले.

कार्यक्रमाप्रसंगी संत गाडगेबाबा यांची वेशभूषा साकारुन समाज प्रबोधन करतांना प्रबोधनकार समतादूत सतीश सोमकुंवर यांनी सांगितले की, संत गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगांव या गावी सखूबाई व झिंगराजी जानोरकर या दाम्पत्याच्या पोटी २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. बाळाचे नाव डेबू ठेवण्यात आले. डेबू लहान असतांना यांच्या वडिलांचे निधन झाले आणि मग त्यांचे कुटुंब दापुरे येथे त्यांच्या मामाच्या गावी आश्रयला गेले. त्यांच्या मामाकडे मोठी शेत जमीन होती. डेबु मामाकडे गुरे राखयचे काम करीत असे. एके दिवशी भल्या पहाटे डेबूजी ने गृहत्याग केला. आणि जिथे जायचे तेथे गांव स्वच्छ करायचे, कोणी सांगेल ते काम करुण पोट भरायचे.

हळूहळू डेबूजीची कीर्ती चहुदिशा पसरू लागली आणि पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटके गाडगे, अंगात चिंध्याचिंध्या पासून बनविलेला पोशाख असे हे पायी फिरणारे व्यक्तिमत्व संत गाडगेबाबा म्हणून संबोधले जावू लागले. संत गाडगेबाबा यांनी स्वच्छते सोबतच माणसाच्या मनातील अंधश्रद्देची घाण दूर सारण्याचा प्रयत्न केला. माणसाचे व्यसनमुक्ती राहवे तसेच अनिष्ठ रूढ़ी परंपरेला त्याज्य ठरवून वैदन्यानिक दृष्टिकोण बाळगण्यास सांगितले. याही पुढे त्यांनी जन माणसाला उपदेश केला की, भूकेल्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या बेसहाऱ्याला निवारा द्या अडाण्याला शिक्षण द्या आणि प्राणी मात्रावर दया करा. असा मौलिक संदेश आपल्या कीर्तनच्या माध्यमातून जनलोकांना केला. गावकऱ्यानी गोळा करुन दिलेल्या पैसातून संत गाडगेबाबा यांनी धर्मशाळा, गोशाळा, रुग्णालय बांधले. समाजात चालत असलेला जातिभेद, वर्णभेद संपवण्याकरिता त्यांनी खुप प्रयत्न केले. असा महान संत गाडगेबाबा २० डिसेंबर १९५६ ला काळाच्या पळद्याआळ गेले. परंतु गाडगेबाबा हे त्यांच्या अलौकिक कार्यामुळे कोटी कोटी जनांच्या हृदयात घर करुन आहेत. आजच्या समाजाने त्यांचे विचार आत्मसात करण्याची फार गरज आहे. असे महत्वाचे प्रसंग, त्यांचा कीर्तनातील उदाहरण व कार्याचे दाखले देत मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच प्रेमनाथ पाटिल यांनी सुद्धा अध्यक्षीय भाषानातून मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गण, कर्मचारी, जि.प.उ.प्रा. शाळेचे विद्यार्थी, गावातील ग्रामस्थ मंडळीनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्तविक शिक्षक नंदकिशोर सोमकुंवर यांनी केले. सूत्रसंचालन निरंजन चामाटे तर आभार विलास घोडे यांनी मानले.

Share on Social media

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
Share on email
Email

Related Post

uddhavthackery-cm-thefreemedia

विधानसभेत बहुमत सिद्ध करा; राज्यपालांचा आदेश

नागपूर: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक मोठी बातमी आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकारनं बहुमत गमावलं

Read More »
chip technology-thefreemedia

आर्मने (Arm )स्मार्टफोन गेम्ससाठी नवीन चिप तंत्रज्ञान लाँच केले

नागपूर: सॉफ्टबँक ग्रुप कॉर्पच्या मालकीची ब्रिटीश चिप टेक्नॉलॉजी फर्म आर्म लिमिटेडने (Arm Ltd) मंगळवारी नवीन चिप तंत्रज्ञानाच्या संचाचे अनावरण केले ज्याचा उद्देश असे आहे की,

Read More »
thumbnail-thefreemedia

‘आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाहीत’; गुलाबराव पाटील

खासदार संजय राऊतांना गुलाबरावांचे प्रत्युत्तर गुवाहाटी: शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. गुलाबराव पाटलांना पुन्हा टपरीवर नाही

Read More »

Latest News