1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच; उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray-thefreemedia
Spread the love

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतुन बंडखोरी करत काही आमदारांसह वेगळा गट केला आणि भाजपच्या पाठींब्यावर राज्यात सरकार स्थापन केलं. यावेळी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रेला सुरवात केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी या सर्व घडामोडींवर तितक्या स्पष्टपणे अद्याप भाष्य केलेलं नव्हतं. त्यामुळे संजय राऊत यांनी सामनासाठी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेत त्यांना विविध विषयावर बोलत केल्याचे पाहायला मिळालं. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी बंडखोरांसह भाजपवर देखील निशाणा साधत विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

यावेळी ठाकरेंना पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का ? असं विचारले असता,”का नाही होणार, तो जर करायचा नसेल तर मग माझ्या लढाईला काय अर्थ आहे असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच माझं शिवसेना प्रमुखांना जे वचन आहे ते आजही कायम असल्याचे ठाकरेंनी यावेळी सांगितले. मी शिवसेनेचाच आहे, पण पक्षप्रमुख आहे. मी मुख्यमंत्री होईल असं बोललो नाही. वचन पूर्ण केल्यानंतर सुद्धा मी दुकान बंद करून थोडी बसेन असं देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नागपूरतील भ्रष्टाचारास बसणार चाप, ‘फाईल ट्रॅकर...

    September 3rd, 2021 | THE FREE MEDIA

    Spread the loveसरकारी काम आणि महिनाभर थांब, असाच काहीसा अनुभव सर्वसामान्यांचा आहे. कर्मचाऱ्यांकडून फाइल निकाली काढण्यात वि...

    ‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांचे निधन...

    January 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveअनाथ मुलांच्या सर्वागीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आणि अनाथांची माय या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या ज्येष...

    परदेशात पीएचडीसाठी रजा देणे अशक्य; ‘ग्लोबल टीच...

    January 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदीड महिन्यांपासून रजेचा अर्ज टेबलावरच सोलापूर जिल्हा परिषद परितेवाडी शाळेचे ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक...