1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अयोध्यायेतील जमीन घोटाळ्याच्या मुद्यावरून शिवसेनेची भाजपवर घणाघाती टीका

Spread the love

भाजप आणि शिवसेनेमधील हिंदुत्वाच्या मुद्यावरून सुरु असलेला वाद शमण्याची चिन्हे नाहीत. शिवसेनेने भाजपवर अयोध्येत झालेल्या जमीन घोटाळ्याप्रकरणी टीकेचे धारदार बाण सोडले आहेत. भारतीय जनता पार्टीचे हिंदुत्व म्हणजे एकप्रकारचा ‘चोरबाजार’ असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. अयोध्येतील भूखंडाचा जो घोटाळा बाहेर आला आहे, तो पाहता भाजपच्या हिंदुत्वात श्रीराम नसून फक्त व्यवहार आहे. बाजूच्या जमिनी लाटण्यासाठी त्यांना मंदिर हवे आहे. त्यांचे ढोंग हे असे उघडे पडले, ही श्रीरामाचीच कृपा म्हणायला हवी. आता कायमस्वरूपी अयोध्येतच ईडी, सीबीआयने एखादे कार्यालय उघडायला हवे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यात भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाषण केले होते. या भाषणात त्यांनी शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे शाह यांनी म्हटले होते. शिवसेनेने भाजपवर आपले मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका केली आहे. भाजपसाठी फक्त पैसा व जमिनी हेच सत्य आहे. लोकांना वाटले देवाच्या आळंदीत जायचे आहे, पण भाजपवाले चोराच्या आळंदीत घेऊन चालले आहेत. अयोध्येस चोरांची आळंदी करणाऱ्यांना श्रीराम माफ करणार नाहीत. देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही. कारण शिवसेना हिंदुत्वाचा भगवा झेंडा घेऊन उभी असल्याचेही ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटले की, भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व म्हणजे एकप्रकारचा ‘चोरबाजार’ आहे, हे वारंवार उघड होत आहे. त्या चोरबाजारात आता अयोध्येचा जमीन व्यवहारही सामील झाला आहे. अयोध्या निकालानंतर राममंदिर परिसरात भाजप पुढारी, भाजपचे आमदार, महापौर, भाजप गटातील नोकरशाही मंडळींनी वैध-अवैध मार्गाने जमिनी खरेदी केल्या. हे व्यवहार संशयास्पद, तितकेच धक्कादायक असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    देशात उदंड झाली करोना लस, आता साठवणीची चिंता

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात करोना लसीची टंचाई पूर्णपणे संपुष्टात आली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. देशात ग...

    यूपीएससी निकालात मुलींची बाजी

    May 31st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2021 चा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल ऑनलाइन उपलब्ध आहे...

    पंतप्रधानांच्या हस्ते संसद वाहिनीचा ‘श्रीगणेशा...

    September 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा मुहूर्त साधून लोकसभा आणि राज्यसभा अश्या दोन स्वतंत्र वाहिन्यांचे एकत्रीकरण करू...